नेल आर्ट म्हणजेच बोटांची नखे रंगवून सजवण्याचा, वाढवण्याचा आणि सुशोभित करण्याचा एक सर्जनशील मार्ग. ही एक प्रकारची कलाकृती आहे जी नखांवर केली जाते.सामान्यतः मॅनिक्योर आणि पॅडिक्योर हे हात -पायाचे सौंदर्य वाढवण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया आहे, त्यानंतर नेल आर्ट करण्यात येते, नखे रंगविणे म्हणजेच नेल पॉलिशच्या कोट लाऊन नखांवर वेगवेगळ्या प्रकारे नक्षीकाम किंवा डिझाईन्स काढणे. काही लोक विविध प्रकारच्या अलंकाराचा वापर करून नखे सजवण्यासाठी ओळखले जातात. या सजावटीत चकाकी, मणी, पंख, रंगबीरंगी दगड, किंवा फुले असे काहीही नखांच्या पृष्ठभागावर चिकटवले जातात. तसेच मौल्यवान वस्तू आणि शोभेच्या वस्तुदेखील वापरल्या जातात. लहान स्टिकर्स सुद्धा सजावटीत उमटून दिसतात.
नेल आर्ट ही फॅशन जगातील नविनतम गोष्ट आहे, आणि फार वेगाने वाढत आहे. नेल आर्ट म्हणजेच बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकाराच्या साहित्याचा वापर करून एखद्या व्यक्तीची नखे सजवण्याची कला होय. आज तंत्रज्ञानामुळे एखाद्याला त्याच्या किंवा तिच्या नखांवर आपल्या आवडीनुसार डिझाईन्स दाखवणे शक्य झाले आहे. नखे आता केवळ केराटीनचे थर नाहीत. तर एखाद्याची सर्जनशीलता व्यक्त करण्याचे माध्यम बनले आहे.
आधुनिक नेल आर्टचे मुळ जपानमध्ये असल्याचे मानले जाते. प्राचीन भारतात मेंहदीसहीत डिझाईन्सच्या स्वरूपात नेल आर्ट खूप लोकप्रिय होते, काही भारतीय जमातीत त्यांच्या अनोख्या नेल सजावटी खूप प्रसिद्ध होत्या. तसेच गेल्या काही दशकात नेल आर्ट जगभरात खूप लोकप्रिय झाल्या आहेत. हाताची बोटे असोत किंवा पायाची नेल आर्ट ही फॅशन स्टेटमेंट म्हणून उदयास आली आहे. जगात अनेक नेल आर्ट स्टुडीओ आहेत जे अधिक विस्तृत आणि व्यवसायीक दृष्टीकोनातून डिझाईन्स उपलब्ध करून देतात. परंतु साधी नेल आर्ट आपण संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घरच्या घरी करू शकतो.
नेल आर्ट म्हणजेच सामान्यतः नखे रंगवने , आणि याची वेगवेगळ्या डिझाईन्स प्रमाणे वेगवेगळी नावे आहेत, तसेच नेल आर्ट बनविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि आपण त्यातील काही महत्त्वपूर्ण पद्धती किंवा प्रकार जाणून घेणार आहोत.
नखे रंगवण्याची रीतसर प्रक्रीया
नखे रंगवण्याची प्रक्रिया ही एक विस्तृत प्रक्रिया आहे. सर्वप्रथम नखे स्वच्छ करून घेतली जातात,तसेच नखांच्या सभोवतालची मृतत्वचा आणि क्यूटीकल काढले जाते. त्यानंतर त्यावर पेंटचा बेसकोट लावला जातो. सामान्यतः पांढरा रंग जेणेकरून डिझाईन्स सुंदर दिसण्यासाठी मदत होते. काही प्रकारांत इच्छित देखावा काढायचा असेल तर बेसकोट लागू केला जात नाही. त्याच्यावर एक्टीव्हेशन पाॅलीशचा कोट लावल्या जातो. ज्यामुळे डिझाईन लवकर सुकते.शेवटी नखांवर आवश्यक डिझाईन रंगवले जाते. विशेष करुन फिकट रंगापेक्षा चंदेरी,सोनेरी, लाल, निळा, हिरवा आणि काळा यांसारख्या गडद किंवा चमकदार रंगांना प्राधान्य देण्यात येते.
नेल आर्ट करण्याच्या पद्धती/ प्रकार
पेंटिंग विथ ब्रश
हि पद्धत इतर अनेक प्रकारच्या रंगकामाप्रमाणेच आहे, जेथे आपण ब्रशचा वापर करू शकतो. सहसा सिंथेटिक ब्रिस्टलची शिफारस केली जाते जे सर्वात योग्य आहेत. या ब्रशच्या मदतीने आवडीनुसार डिझाईन्स काढता येते. तथापी परिपूर्ण स्ट्रोक्स देण्यासाठी आणि आकर्षक डिझाईन्स काढण्यात कुशलता प्राप्त करण्यासाठी योग्य सराव आणि कौशल्याची आवश्यकता आहे. यामध्ये अनेक प्रकारचे डिझाईन व आकार वापरले जातात, उदाहरणार्थ- कोन, सपाट, रेषा, तपशील , ठिपके, निरनिराळे आकार इ. जे नखांवर विविध प्रकारे नक्षीकाम आणि सुंदर नमुने बनवण्यात वापरले जातात.
स्पंज बाॅबींग
नखांवर ग्रेडियंट आणि ॲक्रोमॅटीक प्रकारचे डिझाईन्स बनवण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात येतो. स्पंज वापरल्यानंतर तुम्हाला एक वेगळे स्ट्रक्चर बघायला मिळेल, डिझाईन्स शिंपडल्यासारखी आणि बेस्पॅटर दिसेल. ही पद्धत वापरण्यासाठी सहसा आधी बेसकोट लाऊन तो वाळण्यासाठी सोडला जातो.मग यावर नेलपॉलिश सहित स्पंज वापरून पाहिजे तसे स्ट्रक्चर काढण्यात येते. नंतर अतिरिक्त भाग पुसून घेऊन डिझाईनला फिनीशींग देऊन पूर्ण करण्यात येते.तुम्ही घरीच ही डिझाईन काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्पंज वापरू शकता, जसे कला, मेकअप, पेंट किंवा इतर कुठले. बाजूच्या अतिरिक्त कडा काढण्यासाठी काही उत्पादनांचा वापर करू शकता.
स्टॅम्पींग लुक ग्रेट
स्टॅम्पींग हा एक वेगळा प्रकार आहे. ज्यामध्ये प्रथम नखांवर प्रतिमा छापून तीला इमेजलिटमधील विशेष नेलपेंटच्या स्टम्पी लेयरने झाकणे आवश्यक आहे. नंतर स्क्रॅम्परचा वापर काटेकोरपणे करू शकता, जेणेकरून पॅटर्नमध्ये फक्त नेलपॉलिश अवशिष्ट म्हणून दिसेल. नंतर प्रतीमा क्रीम करण्यासाठी रोलींग ॲसिलेशनमध्ये स्टॅम्पर वापरला जातो आणि नंतर ही प्रतीमा नखांवर व्यवस्थित केली जाते.
टेपींग ऑन नेल
सुरवातीला बेस कलर नखांवर लावला जातो, आणि तो वाळल्यानंतर टेपचे छोटे-छोटे तुकडे करून नखांवर पाहिजे तसे लावले जातात. टेपचे लहान तुकडे त्या भागावर लावले जातात जिथे आधीचा मुळ रंग पाहिजे असेल, त्यानंतर तुम्ही पुढील रंगाचा कोट नखांवर लाऊ शकता. शेवटी हळुवारपणे टेप काढून घेऊन नखांवर फिनीशींग करून घ्यावी.
डिजिटल नेल आर्ट
आजकाल डिजिटल नेल आर्ट मशीन्स आली आहेत. ही मशीन थेरपीस्ट अथवा ब्युटी सलूनमध्ये जास्त वापरली जातात. ह्याची प्रक्रीया स्वयंचलित आहे, आणि म्हणूनच इच्छित नेल आर्ट लूक मिळविण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. नखांवर प्रिंट करण्यासाठी तुम्ही डिजिटल कॅमेर्यांमधून स्कॅन केलेली छायाचित्रे किंवा चित्रेदेखील मिळवू शकता. ही यंत्रे बरीच महाग असतात.
स्टेन्सील मेथड
नेलपॉलिशच्या कोरड्या कोटवर लावलेल्या आणि स्टॅन्सीलच्या प्रतीमेची पार्श्वभूमी म्हणून काम करणाऱ्या स्टॅन्सीलचा वापर करता येतो. मग स्टेन्सील नखांच्या विरूद्ध कडकपणे ठेवली जाते, जसे आपण टेपींगमध्ये करतो. संपूर्ण नखे वेगळ्या रंगाच्या नेलपॉलिशने रंगवले जातात. काही काळानंतर ते कोरडे झाल्यावर स्टेन्सील काढून टाकले जाते. हा प्रकार किचकट आहे.
एअरब्रश नेल आर्ट टेकनीक
नखांवर सुंदर रंग देण्यासाठी एअरब्रश मशीनचा वापर केला जातो. इच्छित डिझाईन काढण्यासाठी हे स्टेन्सील किंवा स्टिकर्स वापरून एकत्र केले जातात. प्रथम बेसकोट लावला जातो, नंतर स्टेन्सीलला वाटप करून इच्छित डिझाईन बनवण्यासाठी एअरब्रश मशीन वापरली जाते. त्यानंतर स्टेन्सील किंचीत काढून टाकण्यात येते आणि एसीटोन काही विशिष्ट प्रकरणांमध्ये विभाजित झाल्यास पेंट काढण्यासाठी वापरला जातो.
नेल आर्ट स्टिकर्स
आर्ट स्टिकर्स आणि डिकल्स हे तुमच्या नखांना सुशोभित करण्याचे नवीन मजेशीर मार्ग आहेत. यामध्ये फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. प्रथम हवा असलेला नेल कोट नखांवर व्यवस्थित लावा, तो वाळल्यानंतर त्यावर विविध प्रकारचे डिकल्स किंवा स्टिकर्स लाऊन सुशोभित करू शकता.परंतु नखांवर स्टिकर्स योग्यरित्या बसविण्यासाठी थोडा सराव हवा. बाजारात विविध प्रकारचे स्टिकर्स आणि डिकल्स उपलब्ध आहेत. हा नेल आर्टचा सोपा प्रकार आहे.
स्प्लॅटर नेल
नेल आर्टमध्ये स्टाईल स्टेटमेंट जोडण्यासाठी टॅटू , ज्वेल्स आणि ग्लीटर सारख्या अनेक प्रकारच्या ॲक्सेसरीजचा वापर ॲण्ड - ऑन म्हणून केला जातो. सर्वात महत्वाच म्हणजे नखांची चांगली काळजी घेणे, जेणेकरून ते निरोगी आणि निटनेटके दिसतील आणि त्यांच्यावर केलेल्या नेल आर्टमुळे ते अधिकच सुंदर दिसतील. हिप स्प्लॅटर नखे बनवण्यासाठी फॅन ब्रश स्ट्रोकचा वापर करू शकतो. परंतु त्याच प्रभावासाठी घरघुती उपाय म्हणून जुना टुथब्रश वापरला जाऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला छान स्प्लॅशी लुक मिळेल.
वाटर मार्बल नेल आर्ट
वॉटर मार्बल नेल्स हे नेल आर्ट तंत्र आहे, ज्यामधे नेल व्हिनीयर क्रिस्टल क्लिअर पाण्यात टाकुन पाण्याच्या पृष्ठभागावर पॅटर्न तयार करणे समाविष्ट आहे. नंतर पॅटर्न नखांवर ॲड केला जातो. हे फार सामान्य आहे तुम्ही त्यातुन अनेक डिझाईन्स बनवू शकता.
शार्पी नेल आर्ट
शार्प नखे जलरंगाशी पेंटींगशी समान असून ते खरेच सुंदर दिसतात. स्मार्ट आणि तंतोतंत डिझाईन बनविण्यासाठी कुणीही हे तंत्र वापरू शकतो, जरी तुमच्याकडे डॅपन डिश नसेल तरीही तुम्ही काही मेणाच्या कागदावर अनियमितपणे लिहू शकता किंवा प्लास्टिक सँडविच पिशवी देखील एक चांगला पर्याय आहे. परंतु तुम्ही अंतीम टॉप कोट घालण्यापुर्वी आधीची रचना कोरडी करायची आहे. नाहीतर तुमची पुर्ण मेहनत वाया जाइल हे लक्षात घ्यावे.
अशाप्रकारे नेल आर्टच्या पद्धती वापरून आणि आकर्षक डिझाईन्स काढून तुम्ही नखांना सुंदर बनवू शकता, जे तुम्हाला फॅशनेबल लुक देतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा