प्रत्येक स्त्री च्या शरीराला एक विशिष्ट आकार असतो. स्त्री च्या शरीराला एक विशिष्ट रचना आहे ज्यामध्ये काही मुख्य मुलभूत आकारामध्ये विभागली जातात. उदाहरणार्थ - सफरचंद/ उलटा त्रीकोण, नाशपाती/ त्रीकोण, आयाताकृती आणि वाळूची घडी/ अवरग्लास हे महत्त्वाचे प्रकार आहे. कुठलीही स्त्री तिच्या आहे त्या आकारात सुंदर दिसते.
फॅशन करणे कुणाला आवडत नाही, प्रत्येकाला आवडते. नवीन ट्रेंडप्रमाणे येणाऱ्या ॲक्सेसरीज, मेकअप आणि वस्त्र परिधान करण्याची आवड प्रत्येक स्त्रीला असते. परंतु ते निवडताना तुमच्या बॉडी शेपला ते सुट होतील की नाही किंवा तुमच्या शरीराचा आकार लक्षात घेऊन खरेदी केली जाते का ? नक्कीच नाही. तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला सुंदर दिसतेच असं नाही. म्हणूनच तुमच्या आकाराचे भान ठेवूनच योग्य ती निवड करण्यात यावी ज्यामुळे तुम्हाला आकर्षक दिसता येईल.
महिलांच्या शरीराचे विविध आकार /Female Body Shape
आयाताकृती आकार /Rectangular Shape / Banana Shape
जर तुमची कमरेची मोजमाप तुमच्या हीप किंवा बस्टशी समांतर असेल तर तुमचा आकार आयाताकृती आहे. तुमचा बस्ट आकार सामान्य असतो . तुमची कंबर जास्त आकर्षक नसते, तुमच्या शरीराचा संपूर्ण आकार सरळ आहे, त्यात कुठेही वक्र अथवा गोलाकार नाही. तुमच्या खांद्याचा, कंबर आणि हीपचा भाग समान असतो. तुमच्या शरीराचे मोजमाप साधारणपणे समानच असते. जसे - Bust- 22, waist - 22, Hips- 22 त्यामुळे तुमच्या शरीराचा आकारात वक्र दिसतील अशी कपड्यांची व ॲक्सेसरीजची निवड करावी. त्याचप्रमाणे कंबर आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करा.
तुम्ही काय घालावे
तुम्ही ऑफशोल्डर टॉप, रुंद गोल गळे आणि ओपन नेकलाइन कपडे घालावे. त्याचबरोबर कॉलरचे आणि फ्रिल्सचे ड्रेस घालू शकता. स्कीनी जीन्स, टूलीप स्कर्ट, क्रॉप पॅन्ट, ट्राउजर आणि कंबर आकर्षक दिसण्यासाठी मोठ्या साइजचे बेल्ट घालावे.
काय घालू नये
चौकोनी गळे, क्रॉप टॉप, ड्राॅप वेस्ट ड्रेसेस आणि जॅकेट घालू नये. स्ट्रेट ड्रेस आणि स्कर्ट घालने टाळा. बॅगी आणि बॉक्सी टॉप घालू नये.
नाशपाती आकार/Pear Shape/त्रीकोणी आकार
तूमचे खांदे अरुंद असतील आणि बस्ट साइज लहान असेल परंतु तुमच्या हीपचा आकार मोठा रुंद दिसत असेल तर तुमचा आकार त्रिकोणी अथवा नाशपाती सारखा आहे. तुमच्या हीपचा भाग बस्ट आणि खांद्यापेक्षा जास्त मोठा दिसतो, आणि गोलाकार असतो. तुमच्या शरीराचे मोजमाप वरच्या बाजूला कमी आणि खाली जास्त असते. जसे - Bust- 22, waist 21, Hips- 24 त्यामुळे तुम्हाला कमरेचा भाग थोडा कमी दिसावा म्हणून बस्ट आणि खांद्याचा भाग वाढीव दिसावा आणि हीप समान दिसावे अशाप्रकारे कपडे आणि ॲक्सेसरीज निवडावी.तुमच्या कमरेवर सरळ लक्ष जावे असे कपडे घालू नये.
तुम्ही काय घालावे
बोट नेक, कॉल नेक, रफल्स आणि व्ही किंवा यु नेकलाइन्सचे ड्रेस घालावे. हायवेस्ट पॅन्ट किंवा स्कर्ट, A-line ड्रेसेस, स्कर्ट, चांगले ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ ॲक्सेसरीज आणि गळ्याभोवती स्कार्फ घालावे.शोल्डर बॅग वापरावी .
काय घालू नये
बॅगी टॉप, ट्युनीक टॉप, बायस कट ड्रेसेस आणि स्कर्ट घालू नये, पेन्सिल स्कर्ट, टाइट स्कर्ट, कमरेखाली जीन्स आणि स्कर्ट घालने टाळा.
सफरचंद आकार/ उलटा त्रीकोण/ Apple Shape
तुमचा बस्ट साइज जास्त असेल, अरुंद खांदे आणि पोटाचा घेर मोठा असेल तर तुमचा आकार सफरचंदासारखा आहे. तुमच्या शरीराचा आकारात सर्वप्रथम तुमच्या पोटावरील चरबी आधी वाढते आणि हात पाय सडपातळ दिसतात. तसेच हीपचा भाग पोटाच्या तुलनेत कमी दिसते.तुमच्या शरीराचे मोजमाप वरच्या बाजूला जास्त आणि खाली कमी होत. Bust-24, waist 24, hip- 22 अशाप्रकारे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराच्या जाड भाग बारीक दिसावा अथवा लपून रहावा यासाठी योग्य निवड करा, ज्यामुळे तुमचा लुक खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
तुम्ही काय घालावे
व्ही किंवा मोठ्या नेकलाइनचे कपडे, कट असलेले टॉप आणि कुर्ते ज्यामुळे पोटाच्या भागी सैलपणा असेल. A-line स्कर्ट, संपूर्ण घेर असलेले ड्रेस, स्ट्रेट जीन्स अशाप्रकारे कपडे थोडे सैल फिटींग आणि हलके असावे. टाइट फीटींगचे कपडे घालू नये. ट्युनिक टॉप घाला.
काय घालू नये
हाय वेस्ट पॅन्ट स्कर्ट घालू नये, कमरेला घट्ट असणारे कपडे व बेल्ट घालने टाळावे. फुगीर आणि आकारहीन कपडे घालू नये. गॅदर्ड आणि रफल्स ड्रेस, शोल्डर बॅग अशवा पर्स वापरु नये.
वाळूचे घड्याळ आकार/ Hourglass Shape
तुमच्या बस्ट आणि हीपचा भाग सुडौल आकर्षक असेल तसेच कमरेला सुंदर वक्र दिसत असेल तर तुमचा आकार घंटागाडी म्हणजे अवरग्लाससारखा आहे. तुमच्या शरीराचा आकार व्यवस्थित गोलाकार आणि सुंदर दिसतो. तुमच्या बस्ट आणि हीपचा भाग समान असून मधल्या भागात कर्व दिसतो. तुमची बॉडी कर्वी आहे. तुमच्या शरीराचे मोजमाप योग्य आहे. Bust-24, waist -22, Hip-24 अशाप्रकारे सुंदर दिसते.
तुमच्या शरीराचा आकार उमटून दिसावा आणि बॉडीचे कर्व झळकतील अशा प्रकारे कपडे आणि ॲक्सेसरीज यांची निवड करावी. व्यवस्थित फीटींगचे कपडे घालावे ज्यामुळे तुम्ही आकर्षक दिसाल.
तुम्ही काय घालावे
स्कुप नेक, स्वीदहर्ट, व्ही नेकलाइनचे ड्रेसेस आणि टॉप घालू शकता. व्रॅप टॉप आणि ड्रेसेस सुंदर दिसतात. पुर्ण घेरचे, A - line , पेन्सिल स्कर्ट, गुडघ्यापर्यंत ड्रेस आणि बेल्ट वापरु शकता.
काय घालू नये
उंच नेकलाइन, लो राइज जीन्स, कट असलेले टॉप, खूप रफल्स आणि फुगीर कपडे घालने टाळावे. ट्युनिक आणि आकारहीन सैल कपडे घालू नये.
तुमच्या शरीराचा आकार कसाही असेल पण तुम्ही सुंदर दिसता. शरीराचा आकार माहीत करून घेणे हा तुमच्या सौंदर्याचा भाग आहे, ज्यामुळे तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही तुमच्या सौदर्याबद्दल जागरूक होउ शकता. स्वतःला कमी किंवा आकारहीन समजणाऱ्या महिलांना सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी उत्तम मार्गदर्शन आहे. तुमच्या शरीराचा आकार माहीत करून घेण्यासाठी तुम्ही पुढीलप्रमाणे मोजमाप घेऊ शकता:-
शोल्डर - तुम्ही कुणाचीही मदत घेऊन, तुमच्या पाठीमागच्या बाजूस एका खांद्यापासुन दुसऱ्या खांद्याच्या टोकापर्यंत टेपने मोजुन घ्यावे.
बस्ट- तुमच्या दोन्ही हातांच्या खालुन, छातीचा घेर मोजायचा आहे. समोरुन मागे टाकून परत समोर टेप घेऊन घेर मोजातांना घट्ट आवळून न धरता १ इंच जागा ठेवून माप घ्यावं.
कंबर - छातीच्या एकदम खालचा निमुळता भाग म्हणजे कंबर मागेपुढे मोजून घ्यावी.
हीप - कंबरेचा खाली येणारा भाग तोही टेप मागुन पूढे घेऊन मोजून घ्यावा.
तुम्हाला तुमचा आकार बदलता येतो का ?
जर तुम्हाला तुमचा असलेला आकार आवडत नसेल किंवा बदलायचा असेल तर तुम्ही व्यायाम केल्यास तुमचा आकार नक्कीच बदलू शकता. तुमच्या कमरेचा किंवा बस्टचा भाग जास्त असल्यास कमी करु शकता किंवा वाढवू शकता . कमरेला गोलाकार वक्र देण्यासाठी प्रयत्न करु शकता.
नियमित व्यायाम आणि योगासने केल्याने दुबळे स्नायू तयार होण्यास मदत मिळते आणि शरीराचा आकार बदलतो. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील हार्मोन्स बदल घडवून आणते जे तुमचं वजन संतुलित ठेवण्यासाठी मदत होते. मेहनत केल्यास सगळं शक्य आहे. तुमच्या शरीराचा आकार बदलायचा असेल तर मेहनत घेतली पाहिजे. किंवा योग्य पद्धतीने ड्रेसअप आणि ॲक्सेसरीज वापर करून सुंदरता मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा