Women's Talk

All issues about women's life,discus here

Post Page Advertisement [Top]

अरूणिमा सिन्हा (जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.)

अरूणिमा सिन्हा (जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.)

 "अरूणिमा सिन्हा", 2011 मध्ये ह्यांना चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आले होते ज्यामुळे त्यांचा डावा पाय कापला गेला . तरीही स्वतःच्या सामर्थ्याने आणि दृढनिश्चयाने अरूणिमा सिन्हा यांनी सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट चढाई करून त्यांच्या यशोगाथेने जगभरातील लोकांना प्रत्येक संकटांवर मात करण्याची प्रेरणा दिली आहे. अरूणिमा यांनी एक पाय कृत्रिम असूनही माऊंट एव्हरेस्ट चढण्याचा पराक्रम कसा केला व त्यांचा अपघात कसा झाला याबद्दल रीतसर जाणून घेऊया.


अरूणिमा यांचे वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडक्यात माहिती 

अरूणिमा यांचा जन्म 20 जुलै 1988 मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील आंबेडकर नगर मध्ये झाला. अरूणिमाचे वडिल भारतीय सैन्यात अभियंता म्हणून कार्यरत होते आणि आई दवाखान्यात आरोग्य विभागात सुपरवायझरच काम करायची. अरूणिमाला दोन भाऊबहीण आहेत. एक मोठी बहिण आणि लहान भाऊ. अरूणिमा तीन वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे अरूणिमा यांचे बालपण साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. 

अरूणिमा यांना लहाणपणापासूनच क्रिडा क्षेत्रात आवड होती त्यामुळे त्या नॅशनल वाॅलीबाॅल प्लेयर देखील होत्या. त्यांच प्रथम शिक्षण गव्हर्न्मेंट गर्ल्स इंटर कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयातील शिक्षण नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ मौंटेनीरींग येथून पूर्ण केलं. इथूनच त्यांनी गिर्यारोहणाचा कोर्स देखील केला.आणि समाजशास्त्र या विषयामध्ये एम.एस.ही पदवी मिळवली.

अरूणिमा यांचे आयुष्य बदलणारा थरारक प्रसंग

अरूणिमा सिन्हा तेवीस वर्षांच्या असतांना, नोकरीच्या इंटरव्यूसाठी  लखनऊहून दिल्लीला जात असतांना काही दरोडेखोर चाकू सुरे घेऊन ट्रेनमध्ये चढले आणि सगळ्यांनाच धमकवू लागले आप -आपले  मौल्यवान वस्तु काढून देण्यास सांगत होते. तिथेच अरूणिमा होत्या त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन बघून एकजण त्यांच्याकडे जाऊन ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असता अरूणिमा हीने चैन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात चकमक झाली आणि त्यांना त्या लोकांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिले.अरूणिमा बाजूच्या रूळावर जाऊन पडल्या त्यांच्या पानावरून दुसरी ट्रेन गेली. रात्रभर त्याच रूळावर पडून असल्याने अनेक गाड्या त्यांच्या पानावरून गेल्या.आणि दुर्दैवाने त्या स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकल्या नाही. सकाळ झाल्यावर गावातील लोकांनी त्यांना जवळच्याच हाॅस्पीटलमध्ये नेले जिथे त्यांचा पाय कापण्यात आला. 


भारताच्या क्रिडा मंत्रालयाने अरूणिमा ह्यांना 25000 रूपयांची भरपाई देऊ केली आणि तिला शक्य तितके सर्वोत्तम उपचार दिले गेले.  परंतु राष्ट्रीय आक्रोशानंतर तिला युवा व्यवहार आणि क्रिडा राज्यमंत्री यांच्याकडून 200,000 रूपयांची अतिरिक्त वैद्यकीय भरपाई देण्यात आली. तसेच CISF मध्ये नोकरीची शिफारस देखील करण्यात आली. त्यांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आणि तिथे त्यांचा चार महिणे इलाज झाला.दिल्लीतील एका खाजगी कंपनीने तिला कृत्रिम पाय मोफत दिला. 

आयुष्यात काहीतरी महान करण्याचा निर्णय 

एवढ्या मोठ्या प्रसंगातून खचून न जाता आयुष्यात काहीतरी महान करायचा निर्णय अरूणिमा यांनी घेतला. तिच्या योजना आणि विचार ऐकून तिथल्या लोकांना आणि डॉक्टरांना फार आश्चर्य वाटत होत . कदाचित एवढ्या मोठ्या अपघातानंतर तिचे मानसिक आजारापासून हा विचार असेल असे सगळ्यांना वाटू लागले.परंतु असे अजिबात नव्हते काहितरी विलक्षण करण्याची तिची जिद्द आणि निश्चय होता. त्यावेळी भारतीय क्रिकेटपट्टू युवराज सिंहकडून ती फार प्रेरीत होती. 

रुग्णालयातून सुटल्यानंतर अरूणिमा घरी न जाता थेट "बनचंद्री पाल"  ह्यांच्याकडे गेली. त्या माऊंट एव्हरेस्ट चढणारी प्रथम महिला होत्या. बनचंद्री पॉल यांनी अरूणिमाला तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यात प्रेरीत केले.त्यानंतर अरूणिमा यांनी बनचंद्री पॉल यांच्या नेतृत्वाखालील काम करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना कठीण परिश्रम करावे लागले. शेवटी 21 में 2013 रोजी सकाळी 10:55 वाजता त्यांनी माऊंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च शिखर गाठले. आणि जगभरात सर्वत्र नावलौकिक केले.

अरूणिमा यांनी आशियातील एव्हरेस्ट,  अर्जेंटिनातील अकोन्कागुआ, आस्ट्रेलीयातील कोशियस्को,  इंडोनेशियातील कार्सटेन्झ पिरॅमिड,  आफ्रिकेतील किलीमांजारो आणि युरोपमधील एल्र्बस या सहा खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई केली होती.सात खंडातील सात शिखरावर चढाई करण्याचे त्यांच ध्येय होतं. 


मिळालेले पुरस्कार आणि सन्मान 

भारत सरकारकडून अरूणिमा सिन्हा यांना 2015 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच डिसेंबर 14  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "बॉर्न अगेन इन माऊंन्ट्स " नावाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.


अरूणिमा सिन्हा यांनी आपल्या जिद्द आणी निश्चयाने ते करून दाखवले जे कदाचित कुठल्याही व्यक्तीला अशक्य वाटते.मनात सकारात्मक विचार करून आणि निश्चय पक्का करून कुठलाही गड जिंकता येतो हे अरूणिमा यांनी सिद्ध करून दाखवलं.एवढंच नाहीतर जगातील प्रत्येक संकटांवर मात करता येते ह्याची प्रेरणा त्यानी आपल्याला दिली. जगातील अपंग आणि विकलांग लोकांना नवीन दृष्टीकोन मिळवून दिला शरीरातील एक अंग कापल्यानंतर आयुष्य संपत नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. तसेच  आजच्या काळात महिलांना कमजोर आणि कमीपणा देणाऱ्यास देखील निश्चय असेल तर महिला काहीही करू शकतात हे दाखवले. प्रत्येकजण ह्या साहसाने प्रेरीत होतो.

आपल्या आयुष्यात थोडही नुकसान झालं तर निराश होऊन बसणारे आणि आत्मविश्वास गमवून आत्महत्येचा विचार करणारे अनेक लोक आपण बघतो.परंतु जे स्वप्न पूर्ण करण्यात अडचण येते त्यालाच नविन दृष्टीकोनातून विचार करून इच्छित संकल्प पूर्ण करण्याची प्रेरणा अरूणिमा यांनी आपल्याला दिली. सहा शिखरावर चढाई केल्यानंतर अचानक अपघात होऊन पायच कापला गेला असतांनासुद्धा निराश न होता,, कृत्रिम पायाने माऊंट एव्हरेस्ट चढाई करून काहीतरी नवीन आणि महान करता येईल हा विचार खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि दृढ निश्चय करून इच्छित गोष्ट निरंतर परिश्रम करून मिळवणे हे खूप साहसाचे आणि धैर्याचे लक्षण आहे.

प्रत्येक महिलेने असेच सकारात्मक विचार आणि दृढ निश्चय करून प्रत्येक संकटांवर मात करीत पूढे चलायला हवे. संकट हे आपल्याला नवीन दृष्टीकोन मिळवून देतात. 






  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bottom Ad [Post Page]