लठ्ठपणा म्हणजे शरीरातील अती चरबीचा समावेश असलेला विकार ज्यामुळे आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
"सगळं केलं बाई पण लठ्ठपणा कमी होतंच नाही."
आजच्या काळात लठ्ठपणा ही एक सार्वजनिक बाब झाली आहे. अनेक पुरुष व महिला लठ्ठपणामुळे त्रासलेले आहे, आपण महिलांच्या समस्येबद्दल बोलूया. आजच्या काळात दैनंदिन जीवनात फेसबुक आणि सोशल मीडियाशिवाय दिवसाची सुरूवात अशक्य आहे. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम सोशल मीडियच दर्शन घेऊन मगच दिवस सुरू होतो, त्यामुळे लठ्ठपणामुळे त्रासलेल्या लोकांना, लठ्ठपणाची कारणे, व्याख्या आणि अनेक प्रकारच्या उपाययोजना अगदी रोज मिळत असल्याने वेगळी माहिती देण्यात काही अर्थ नाही. तरीही बायकांमध्ये लठ्ठपणा अनेक प्रकारच्या कारणांमुळे होतो जसे - अनियमित मासिक पाळी, डिलेवरी, थायरॉईड, हार्मोन्स बदल, अनियमित आहार, शारीरिक कष्टांची कमी आणि बरेच काही. त्यावरील उपाय अनेक माध्यमातून तुम्हाला मिळते.
मुळ प्रश्न हा आहे, की अनेक प्रकारे प्रयत्न करुनही यश मिळत नाही किंवा अनेक उपाय करूनही वजन कमी का होत नाही."मी सगळं काही केलं पण वजन कमी झाले नाही असे बोलणारे खूप लोक आहेत." तर असे का होते हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
नविन कुठली रेसिपी असो वा लठ्ठपणाचा उपाय, सोशल मीडियाच्या ट्रेंड प्रमाणे नैसर्गिकरीत्या वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे उपाययोजना सक्रीय आहेत मग ते सगळे उपाय आपण करुण बघतो, त्यामुळे सकाळी लवकर उठून कधी गरम पाणी निंबू घालून पीतो तर कधी मध घालून,कधी शुगर फ्री घेतो, कधी मटकीची ऊसळ खाऊन, तर कधी जीऱ्याचं पाणी पीऊन असे अनेक उपाय करूनही वजन कमी झाले नाही तर.
मग आपण व्यायाम आणि बॉडी फिटनेससाठी तयारी म्हणून जीम जॉईन करतो . त्यासाठी कम्पल्सरी ट्रेक पॅन्ट आणि टीशर्ट, सामान कॅरी करायला बॅग, बॉटल, नवीन शुज असा सगळा खर्च करतो. पण तरीही वजन कमी होत नाही.
मग आपण अधिक गंभीरपणे विचार करतो, त्यासाठी डॉक्टर चा किंवा डायटेशीयन चा सल्ला घेतो. आणि डाएट चार्ट बनवतो कारण नुसतं व्यायाम केल्याने वजन कमी होत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे डाएट प्लॅन हवाच, मग नवीन शेड्युल नुसार सगळं काही केलं जातं.पण तरीही प्रयत्न यशस्वी होत नाही मग आपण कंटाळून सगळं सोडून मी आहे तशीच ठीक आहे म्हणून मोकळे होतो.
"मी सगळं ट्राय केलं पण वजन काही कमी होत नाही",
एवढे उपाय करूनही वजन कमी का होत नाही ?
या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. सुरुवातीला आपण दररोज सकाळी उठून निंबू घालून गरम पाणी पीतो. मग दुसऱ्या दिवशी दुसरी न्युज आली की जीरा पाणी पीतो ,मग तिसऱ्या दिवशी अजून काही वेगळे करतों, करून पाहणं आपल्या स्वभावात आहे, नाही का. पण नियमितपणे कुठलीच गोष्ट पुढे करत नाही आठ दिवस झाले की कंटाळून "कसलं काय यांनी काही होत नाही म्हणून सोडून देतो. मग बायका जीम जॉईन करतात, चटईवर, कपड्यांवर आणि बाकी गोष्टींवर खर्च करतात आणि आठवडाभर जीममध्ये खूप मेहनत घेतात. सुरुवातीला दोन दिवस वेळ नसतो मग हळूहळू सर्वांशी ओळख होते, मग हळूहळू मैत्री वाढते, तेव्हा वजनाकडे लक्ष रहात नाही. मग जीममध्ये जाऊन सरळ सायकल वर बसायचं, सायकलचा नट ढीला करायचा आणि तासभर पायडल फीरवायचं. तेवढ्यात थकवा येतो मग मी जरा बसते असं म्हणायचं आणि मस्त गप्पा मारायच्या. मग काय नंबर शेयर करून ग्रुप तयार होतो. मग घरात पाहुणे येणार, मुलांची शाळा, भावाचं लग्न, अहोंचे मित्र जेवायला आले होते, काल खूप काम झालं आज इच्छा नाही, तु येणार नाही मग मी जाऊन काय करणार जाऊदे सगळ्याजणी एकदाच भेटू. अशा प्रकारे जीम बाजूला ठेवून किट्टीपार्टीची सुरुवात होते.आणी जीम बिचारी एकटीच राहते. मग जीम फक्त नावाला आणि डिस्कशन जास्त.
शेवटी प्रश्न जीथला तिथे, ६ महिने जीमला गेली वजन मेलं जीथल्या तिथे, कशाच काय काही होत नाही.
मग नवीन सल्ला मिळतो अगं नुसतच जीम करून होत नाही डाएट प्लॅन हवाच मगंच वजन कमी होत. मग नवीन शेड्युल नुसार सगळं काही केलं जातं सकाळी फ्रुट आणि ज्युस, दुपारी सॅलड्स आणि रात्री हलकं जेवण , गोड खाणं बंद. किमान आठवडाभर मस्त चालतं " मी नाही घेणार मी डाएटवर आहे". आठवड्याभरात तोंडाची चव जाते काहीतरी चटपट खायला हवं, एक दिवस खाल्ल्याने काही होत नाही म्हणून चौपाटीवर जाऊन मनसोक्त खायचं, मग हळूहळू पाहुणे आले होते मग मॅनेज कसं करावं, दुसऱ्याच्या घरी आपण नाही कसं बोलणार, सख्या बहिणीच लग्न होतं, मुलाची बर्थडे पार्टी असं म्हणता म्हणता डाएट प्लॅन कधी संपला कळतच नाही.
पण प्रश्न मात्र तिथेच, एवढे पैसे वाया घातले पण काही झालं नाही वजन कमी होतंच नाही.😀
वजन कमी होत नाही, कारण नियमितणा नाही.
खरंतर वजन कमी करण्यासाठी एवढे लेख, कारणे आणि उपाययोजना दिलेल्या आहेत त्या सगळ्या योग्य आहे. वजन कमी करण्यासाठी आपण जे काही करतो ते नियमितपणे केलें तर नक्कीच यश मिळतं. उपाय कुठल्याही पद्धतीने करा परंतु तो खंड न पडू देता करा. खरंतर कुठलीही गोष्ट करायला इच्छाशक्ती मजबूत असावी लागते, जर तुमची वजन कमी करण्यासाठी प्रबळ इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल. कुठल्याही गोष्टीला नियम पालन करुन केले तर ते पूर्णत्वास जाते. नियमित सराव केल्यास कार्य सफल होते, कुठलाही एक उपाय निवडा आणि तो पूर्ण इमानदारीने करा वजन नक्कीच कमी होईल.
कुठलीच गोष्ट चमत्काराने घडत नसते, प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे प्रयोग आणि कष्ट करण्याची तयारी असली तरच ते घडते. तुमचं शरीर कसं आहे, त्यासाठी कोणता उपाय योग्य आहे ते ठरवावे आणि मनापासून कष्ट करावे वजन कमी होते. कुठलंही कार्य नियमितपणे केल्यास वजन कमी झाल्यावाचून राहणार नाही. विश्वास आणि संयम या दोनच गोष्टी ध्यानात ठेवून प्रयत्न करा. खूप काळापासून वाढलेले वजन लवकर कमी होणार नाही, त्यासाठी तूम्हाला दिर्घकाळ संयम ठेवण्याची गरज आहे. कारण बरेच वर्ष वाढलेली चर्बी अथवा वजन कमी होण्यासाठी खूप कष्ट आणी संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी तूमचे तूमच्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. आळस दुर करा आणि निश्चय करा की मला हे करायचेच आहे, नियमित प्रयत्न करा . स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहे. तूम्ही तूमच्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवले नाही तर कुठलाच प्रयत्न यशस्वी होणार नाही. कूठलीही नवीन गोष्ट सूरू करण्याअगोदर स्वतःमद्धे बदल करणे आवश्यक आहे. पूर्णपणे विचार करून, निश्चय करूनच मग सुरूवात करावी. मनापासून केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही.
वजन कमी होतं ! करून बघा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा