Women's Talk

All issues about women's life,discus here

Post Page Advertisement [Top]

सुमन (भाग २)

सुमन (भाग २)

        सुमन घरुन निघतांना आयुष्यात काहीतरी करायचं असं ठरवून निघाली. पण नेमकं कुठे जावे काय करावे हे तिला सुचेना, ती एवढे वर्ष घराबाहेर पडलीच नव्हती. बाहेर कुणीच तिच्या ओळखीचं नव्हतं, तिने थोडा विचार केला आणि शहरातील तिच्या शाळेत गेली. तीथे तिच्या जुन्या शिक्षकांना भेटून मदत मिळते का बघायला. ती शाळेत गेली तेंव्हा तीच्या जून्या सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्या असं तीला समजलं, सुमन खूप निराश झाली आता काय करावे काहीच सुचत नव्हते. 

ती भरल्या डोळ्यांनी शाळेच्या गेटवर बसली आपण घर सोडून चुक तर नाही ना केली असं तीला वाटू लागले. पण म्हणतात ना आपण काही तरी चांगलं केलं तर आपलंही चांगलेच होते. अचानक एक गाडी तीच्या जवळ येऊन थांबली त्यातुन एक सभ्य गृहस्थ बाहेर पडले, ते सुमनजवळ येऊन थांबले आणि म्हणाले तु सुमन आहेस ना. सुमन घाबरत हो म्हणाली अग ं. इथे काय करते आणि एवढे वर्ष कुठे होतीस , सुमन आश्चर्याने बघत होती, अगं ओळखलं नाहीस का मला मी तुझा वर्गमित्र विनय, एवढे वर्ष घराबाहेरच्या जगात नव्हतीच ती घरात पटकन उत्तर देणाऱ्या सुमनला काही सुचेना ती फक्त बघतच होती, त्याने परत विचारलं काय झालं, कशीबशी सावरत मला मीरा मॅडमला भेटायचं आहे एवढंच ती बोलली. तिची अवस्था त्याला लगेच समजली, बरंबर घाबरु नकोस , आधी मला निट काय ते सांग. तीने आपण संकटात आहे याची जाणीव करून दिली. तो म्हणाला मॅडमची तर बदली झाली पण प्रीया इथेच आहे तिच्याकडे जाऊया. आणि तो सुमनला तीच्या मैत्रिणीकडे म्हणजेच प्रीयाकडे घेऊन गेला. 

तिथे गेल्यावर सुमनला कळले की प्रीया आता मोठी डॉक्टर झाली होती. सुमनच्या मनात अनेक विचार येऊन गेले तीची मैत्रिण डॉक्टर झाली आता ती मला ओळखेल का? जीथे रक्ताची नाती उपयोगी पडली नाही, तीथे दुसरे मदत करतील का? ,, तेवढ्यात प्रीया तेथे आली आणि सुमनला पाहताच तिनं तिला मीठी मारली, काय' मॅडम" कशी आहे, कुठे होतीस इतके दिवस , काय करते. सुमन थोडं थांबून म्हणाली मला मदत हवी आहे. तीने विचारलं कसली मदत, काय झालं काही दुखतंय का? नाही गं मी खूप मोठ्या संकटात आहे मला मदत हवी आहे तिच्या डोळ्यांत पाणी आलं. बरं रडू नकोस निट सांग काय झालंय. सुमनने तिला सर्व काही सांगीतले तीच्याही डोळ्यात पाणी आलं, आणि ती लगेच म्हणाली अगदी योग्य केलंस.अगं पण आता मी जाणार कुठे मला काही कळत नाहीये. ती म्हणाली कुठे जायची गरज नाही मी आहे ना अजीबात काळजी करू नकोस. हे शब्द ऐकून सुमनला रडू आवरेना ती प्रीयाच्या गळ्यात पडून खूप रडली प्रीयानेही तिला मायेनं आधार दिला. सुमन म्हणाली मला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे पण मला काम कोण देणार मला काहीच येत नाही. प्रीया म्हणाली कोण म्हणतं तुला काही येत नाही एवढे दिवस एवढ्या लोकांना सांभाळलंस तेच कर, म्हणजे... सुमनने आश्चर्याने विचारले. अगं घाबरु नकोस माझ्या हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम कर आणि मी पगारही देईल तुला. सुमनचा तीच्या कानावर विश्वासच बसेना  एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी एवढे लवकर उत्तर मिळेल याची अपेक्षाच तिने केली नव्हती.पण म्हणतात ना आपण लोकांसाठी काहीही चांगलं केलं तर आयुष्यात त्याच फळ परतुन आपल्याकडे नक्की येतं.सुमनला तीने निस्वार्थीपणे केलेल्या कष्टांची परतफेड म्हणून प्रीया मिळाली. जीने सुमनला तीच्या अत्यंत वाईट प्रसंगी मदत केली. 

अगं पण मला जमेल का? सगळं जमेल, शाळेत हुशार होतीस तू विसरु नकोस आणि मी आहे ना मदतीला. सुमनने प्रीयाचे खुप मनापासून आभार व्यक्त केले. जगात सगळीच माणसे सारखी नसतात सुमन प्रीया म्हणाली.

सुमनने प्रीयाच्या हाताखाली काम करण्याची सुरुवात केली, सुरुवातीला तीला सगळ्या गोष्टींना शिकायला थोडं कठीण गेलं, तिला घरची आणि घरातील व्यक्तींची खूप आठवण येत होती. त्याचबरोबर त्यांनी केलेली वागणूक त्यांनी असं का केलं, असे अनेक प्रश्न मनात यायचे आणि ती निराश होऊन एकट्यात खूप रडायची. पण हळूहळू तीने स्वतःला सावरले कारण जे घडायचे होते ते घडून गेले, आता मात्र तीला पुढे स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडावी लागणार होती.म्हणून तीने जोमाने शिकायला सुरुवात केली, आणि थोडेच दिवसात चांगले काम शिकून घेतले, तसेच तीला कामं करतांना नवीन मित्र, मैत्रिणी भेटल्या. बाहेरच्या जगात वावरताना तीला खूप चांगले -वाईट अनुभव आले. अनेक प्रकारची चांगली-वाईट लोक मिळाली, त्यामुळे तीला अजून खूप काही शिकायला मिळालं.त्याचबरोबर वेगवेगळे अनुभव मिळाले पण प्रीयाने मात्र तिला खूप साथ दिली. जीथे आपल्यांनी तीला छळले होते तीथेच परक्या लोकांनी तीला प्रेम दिले. हळूहळू सुमन खूप हुशार झाली तीला आता सगळं हॅन्डल करणं जमायला लागलं. त्यामुळे तीने कामातून वेळ काढून पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं.घरुन परीक्षा देऊन का होईना पण सुमनने बी. ए. केलं होतं आणि तिचे कागदपत्रे ती सोबत घेवून आली होती. 

सुमनने खूप मेहनत घेतली नोकरी बरोबर तिने पुढील शिक्षण घेतले, तशी ती हुशार होतीच पण बाहेर काम केल्यामुळे तीला आणखी अनुभव मिळाले. आणि तीचे मित्र -मैत्रीणी होतेच मदतीला. सुमनने मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि PHD करून डॉक्टरेट ची पदवी मिळवली.तीच्या यशाचे कौतुक करायला तिचे नातेवाईक नव्हते पण तीच्या वाईट काळात मदत करणाऱ्या मैत्रिणी मात्र सोबत होत्या. आज सुमन खूप खूप आनंदी होती. तीचं स्वप्न पूर्ण झालं होतं, आज ती स्वतःच्या पायावर उभी होती.

तात्पर्य:- आयुष्यात किती सहन करावे हे तुमचं तुम्हालाच कळायला हवं. कुठल्याही गोष्टीला कधीच उशीर होत नाही, तुम्ही आत्मविश्वासाने सुरवात करून बघा यश नक्कीच मिळेल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bottom Ad [Post Page]