Women's Talk

All issues about women's life,discus here

Post Page Advertisement [Top]

तुमच्या त्वचेचा प्रकार (Skin Types)

तुमच्या त्वचेचा प्रकार (Skin Types)

 तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी ,तुम्हाला तुमच्या त्वचेला निरोगी ठेवणे आवश्यक आहे. तुमची त्वचा तुमच्या सौंदर्याचा आणि शरिराचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि त्याला समजून घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या त्वचेला हितकर उत्पादने निवडू शकत नाही आणि योग्य काळजी घेऊ शकत नाही. म्हणूनच त्वचा आणि त्याचे प्रकार (Skin Types) निट समजून घेणे आवश्यक आहे.

त्वचेचे विविध प्रकार अस्तित्वात आहे आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. वेगवेगळ्या लोकांच्या त्वचेचे प्रकार वेगवेगळी असतात, आणि प्रत्येक त्वचेची वैशिष्ट्ये भिन्न असतात. तुमच्या स्वतःच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी आधी त्वचेचे कोणकोणते प्रकार आहे आणि ते कसे भिन्न आहेत याबद्दल रीतसर माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहीत असेल तर तुम्ही त्याची योग्य काळजी घेऊ शकता. जसे - तुमच्या त्वचेला काय सुट होतं काय नाही, कुठली स्कीन प्रोडक्ट वापरायची, कुठले माॅइश्चरायजर लावावे, कसा मेकअप निवडावा हे तुम्हाला कळायला हवं.


चला तर मग आपण बघूया त्वचेचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये:- 

सामान्य त्वचा (Normal Skin)

सामान्य त्वचा ही खूप चांगली आणि संतुलित मानली जाते, ही त्वचा खूप कोरडी किंवा खूप तेलकट नसते. ही त्वचा खूप कमी प्रतिक्रियांमुळे बहुतेक उत्पादने सहन करू शकते. ह्या त्वचेला जास्त देखरेखीची गरज नसते, साधारण दोन वेळा चेहेरा धुऊन स्वच्छ ठेवल्यास उत्तम आहे. त्यामुळे तुम्हाला सामान्यतः लालसरपणा आणि चिडचिडेपणा बद्दल काळजी करण्याची गरज नाही. ही नैसर्गिक सुंदरता देते.

कोरडी त्वचा (Dry Skin)

कोरडी त्वचा ओळखणे सोपे आहे. चेहऱ्यावरील कोरड्या त्वचेच्या मृत पेशींचा थर वरच्या बाजूला साचल्यामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. कोरडी त्वचा कधीकधी खुप रुक्ष आणि घट्ट ओढल्यासारखी वाटू शकते. विशेषकरून थंडी आणि हिवाळ्यात ऋतूमध्ये अधिक कोरडी पडते. कोरड्या त्वचेत कमीत कमी सीबम उत्पादन असते त्यामुळे तुमची त्वचा तुम्हाला पाहिजे तशी हायड्रेट राहत नाही. कोरड्या त्वचेचा पोत प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे बऱ्याच जणांना त्वचेवर लालसरपणा येतो आणि काही वेळा ऋक्ष होऊन खाज सुटते. 

ज्यांची त्वचा कोरडी पडते त्यांनी कटाक्षाने उष्ण सरी आणि सुर्यप्रकाश टाळावा. साबण आणि डिटर्जंट अशा उत्पादनांचा वापर करू नये. जास्तीत जास्त क्रीमबेस आणि सॉफ्ट उत्पादने निवडावी. 

संवेदनशील त्वचा (Sensitive Skin)

संवेदनशील त्वचा ही समजून घेणे थोडं कठीण आहे, ही त्वचा खूप संवेदनशील असते ज्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, मुरुमे आणि पुरळ सहीत त्वचेला दाह जाणवतो. संवेदनशील त्वचेला जळजळ होणे किंवा चिडचिड द्वारे दर्शविले जाते. यामध्ये एक्झिमा, रोसेसीया किंवा इतर ऐलर्जी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्यापैकी बरेच जणांना त्वचेवर डाग, पुरळ सहीत अन्य त्रास काही स्किनकेअर प्रोडक्ट वापरल्यास जाणवते. परंतु ती सहाजिकच असते. पण संवेदनशील त्वचेच्या समस्या या कायम जानवतात. त्यामुळे ह्या प्रकारच्या त्वचेवर जास्त कष्ट करण्याची गरज आहे.

तेलकट त्वचा (Oily Skin)

तेलकट त्वचा ही जास्त सीबम च्या उत्पादनामुळे कायम चेहऱ्यावर नैसर्गिकरीत्या तेल स्त्रावत असते. अधिक तेलकटपणामुळे त्वचा फुटणे, पुरळ येणे, आणि मृत त्वचा जमा होते. तेलकट त्वचेचा एक चांगला गुण म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात. ही त्वचा जास्त ओलावा टिकवून ठेवते त्यामुळे कोरड्या त्वचेच्या तुलनेत चांगली दिसते. तुमच्या चेहऱ्यावर सारखा तेलकटपणा जाणवतो त्यामुळे याची काळजी घ्यावी लागते. 

संयोजन त्वचा (Combination Skin)

संयोजन त्वचा कोरडी आणि तेलकट दोन्ही स्वरूपात दर्शविली जाते. सामान्यतः गाल आणि जबड्यात कोरडेपणा असलेले भाग . तुम्हाला तेलकट भागात वाढलेली छीद्रे किंवा त्वचेचा खडबडीतणणा जानवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला व्हाइटहेड आणि ब्लॅकहेड्सची समस्या निर्माण होतात. संयोजन त्वचा हा त्वचेचा सर्वसामान्य प्रकार आहे. बऱ्याच लोकांना ते कळत नाही, की त्यांची त्वचा मिश्र आहे त्यामुळे ते कोरडी किंवा तेलकट त्वचेचा उपाय करतात. तुमच्या त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ कोरड्या त्वचेचा किंवा तेलकट त्वचेचा उपाय केल्यास तुमच्या मीश्र त्वचेला अधिक हानी होते. त्यामुळे ह्या प्रकारच्या त्वचेवर जास्त मेहनत घेतली पाहिजे.


त्वचेचे विविध प्रकार पाहून तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की प्रत्येक व्यक्तीप्रमाणे त्वचेचे प्रकार वेगवेगळी असतात. आणि त्यांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची उपाययोजना करावी लागते. चूकीच्या त्वचेवर चुकीचे उपचार तुमचा चेहरा अजूनच खराब करु शकतो. म्हणूनच योग्य त्वचेला योग्य उपचार करून सुंदरता वाढवता येते. 

एकाच प्रकारच्या पद्धतीचे फायदे वेगवेगळ्या त्वचेला हितकर नाहीत. जसे - बेसन, दही, निंबू हे नैसर्गिक उपाय जरी असले तरी संवेदनशील किंवा पुरळ सहीत दाहक त्वचेला अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या त्वचेचा योग्य प्रकार लक्षात घेऊनच कुठलाही उपाय अथवा सौंदर्य प्रसाधने वापरावीत. तुमच्या त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी हे खूपच महत्वाचे आहे.


मग मैत्रिणींनो तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहीत आहे का ? नक्की कळवा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bottom Ad [Post Page]