त्वचेचा टोन म्हणजेच तुमच त्वचेच्या पृष्ठभागाचा रंग असतो. आणि अंडरटोन म्हणजेच त्वचेच्या पृष्ठभागाखालील सूक्ष्म रंग असतो. त्वचेचा टोन तुमच्या त्वचेच्या वरच्या भागात असलेल्या मेलेनिन च्या प्रमाणानुसार ठरवला जातो. तुम्ही दैनंदिन जीवनात योग्य प्रकारचा मेकअप, कपडे, ज्वेलरी आणि सौंदर्य विषयक गोष्टी निवडण्यासाठी तुम्हास तुमचा Skin Tone माहीत असणे आवश्यक आहे.
तुम्ही कोणत्याही प्रकारचा चूकीचा मेकअप लाऊ नये. तुमच्या रंगानुसार फाऊंडेशन आणि कन्सीलरची योग्य निवड करण्यासाठी तुमचा त्वचेचा टोन जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच तुमचा Skin tone समजून घेतल्याशिवाय तुम्हाला कपड्यांचा रंग, लिपस्टिक चा शेड, केसांचा रंग (hair color) आणि इतर आकर्षक गोष्टी निवडण्यास मदत मिळते. आधिच्या काळात सौंदर्य प्रसाधने कमी होती, त्यामुळे प्रकाशाच्या श्रेणी मध्यम व गडद हे ठरवणे सोपे होते. परंतु आज मेकअप च्या प्रसाधनांचा विस्तृत वर्गीकरण वाढल्याने अनेक प्रकारच्या फाऊंडेशन शेड आणि श्रेणी समजून घेणे आवश्यक आहे.
SKIN TONE हे चार प्रकारचे असतात गोरा, मध्यम, सावळा आणि जास्त सावळा/ काळा . भारतीय स्त्रियांमध्ये हे मुख्य त्वचेचे रंग प्रकार आहेत. पण त्वचेच्या रंगकामाप्रमाणेच श्रेणीही वेगळी आहे.तुमचा अंडरटोन तुमच्या रंगापेक्षा वेगळा आहे.जो तुमच्या त्वचेची सावली सारखा दिसतो. त्वचेच्या अंडरटोन तीन श्रेणीत विभाजित होतो.
थंड /Cool undertone - त्वचा थंड, निळसर, गुलाबी किंवा उग्र रंगाची दिसते.
उष्ण/undertone - त्वचा पिवळी किंवा सोनेरी रंगाची किंवा पीच रंगाची दिसते.
तटस्थ/undertone - हे थंड आणि उबदार अंडरटोनचे मिश्रण असते.त्वचेचा नैसर्गिक रंग अधिक स्पष्ट दिसतो.
त्वचेचा टोन आणि अंडरटोन कसा ओळखावा
तुमच्या हाताच्या नसा तपासा
आपल्या हातांच्या मनगटावरील शिरा किंवा नसा बघा, नसा हिरव्या रंगाच्या दिसत असतील तर तुमचा अंडरटोन उष्ण म्हणजेच warm undertone आहे. आणि तुमच्या हाताच्या नसा निळ्या रंगाच्या दिसत असतील तर तुमचा अंडरटोन थंड म्हणजेच cool undertone आहे.आणि जर तुमच्या नसा निळसर - हिरव्या असतील तर तुमचा अंडरटोन तटस्थ म्हणजेच Neutral undertone आहे हे निश्चित करावे.
कागदाचा टुकडा वापरा
चमकदार पांढर्या रंगाचा कागदाचा टुकडा घ्या आणि तो तुमच्या चेहर्याच्या बाजूस धरा जर तुमची त्वचा शीटच्या विरूद्ध पिवळसर दिसत असेल तर तुमचा अंडरटोन उष्ण म्हणजेच warm undertone आहे.आणि तुमचा चेहर्याचा रंग गुलाबी दिसत असेल तर तुमचा अंडरटोन थंड म्हणजेच cool undertone आहे. आणि तुमच्या चेहर्याचा रंग जर हिरवट किंवा राखाडी दिसत असेल तर तुमचा अंडरटोन तटस्थ म्हणजेच Neutral undertone आहे असे समजावे .
सूर्यप्रकाशात उभे राहून बघा
सूर्यप्रकाशात उभे राहल्यावर जर तुमचा चेहेरा गुलाबी दिसत असेल तर तुमचा अंडरटोन थंड म्हणजेच cool undertone आहे. आणि सूर्यप्रकाशात उभे राहल्यावर तुमचा चेहेरा गोल्डन - ब्राऊन दिसत असेल तर तुमचा अंडरटोन उष्ण म्हणजेच warm undertone आहे तसेच तटस्थ आहे.
तुमच्या डोळ्यांचा रंग बघा
तुमच्या डोळ्यांचा रंग निळा आणि फिकट तपकिरी असेल तर तुमचा अंडरटोन थंड आहे असे समजावे. आणि तुमच्या डोळ्यांचा रंग जास्त तपकिरी असेल तर तुमचा अंडरटोन उष्ण आहे असे मानतात.
त्वचेचा अंडरटोन किंवा टोन महत्त्वाचा का ?
तुमच्या त्वचेचा अंडरटोन काय आहे हे कळल्यावर तुम्ही तुमच्या टोनच्या प्रकारानुसार योग्य सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करू शकता. तसेच योग्य कपड्यांची निवड करू शकता.तसेच फाऊंडेशन शेड्स, आयलायनर कलर्स आणि लिपस्टिक चा शेड निवडण्यास मदत होते.ज्यामुळे तुमचा मेकअप तुमच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतो. तुमची ज्वेलरी आणि ॲक्सेसरीज निवडण्यास सुद्धा मदत होते. तुमच्या सौंदर्य वाढविण्यासाठी तुमच्या टोन आणि अंडरटोन नुसार योग्य निवड करणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा