Women's Talk

All issues about women's life,discus here

Post Page Advertisement [Top]

तुमच्या सौंदर्याचे खरे रंग शोधा

तुमच्या सौंदर्याचे खरे रंग शोधा


जर तुम्हाला तुमचे केस कापायचे नसतील तर स्टायलिंग करण्यासाठी हेयर कलर करणे हा एक उत्तम निर्णय असू शकतो.पण हेयर कलर आणि हायलाईट करण्याआधी काही बेसीक गोष्टी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लेटेस्ट फैशनला डोळे बंद करून फॉलो करण्यापेक्षा आपल्या स्कीन टोन आणि केसांच्या टेक्सचरला लक्षात घेऊनच कलरची नीवड करावी.

                           Hair color shade's with name(केसांच्या रंगाचे प्रकार आणि त्यांची नावे)


तुमच्या केसांसाठी निवडलेले योग्य रंग तुमचे सौंदर्य खुलवते.

तुमच्या त्वचेच्या रंग(skin tone) प्रकार हा तुमच्या केसांचा रंग ओळखण्यासाठी प्रारंभिक बिंदू आहे,तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार पूरक आणि तुम्हाला नैसर्गिक रंग देणारी प्रक्रीया शोधणे हेच ध्येय आहे.खुप गडद रंग निवडणे ही काही महिलांची चुक आहे,जेंव्हा शंका असेल तेंव्हा हलक्या शेडमध्ये जा.तुमच्या त्वचेला हितकारक असेल अशा रंगाची निवड करा.

 

तुमचा अंडरटोन कसा ओळखावा(Skin Tone)

तुम्ही कुल अंडरटोन आहात कि वार्म, हे ओळखण्यासाठी आपल्या हातांची नस बघा जर ती हिरवी दिसत असेल तर तुम्ही वार्म अंडरटोन आहात आणि जर नस निळ्या आहेत तर तुम्ही कुल अंडरटोन आहात. अंडरटोन माहीती करण्याचा एक आणखी प्रकार आहे तो म्हणजे सुर्यप्रकाश. उन्हात उभ राहल्यावर तुमचा चेहरा गुलाबी होत असेल तर तुमचा स्कीनटोन कुल आहे,आणि जर उन्हात उभ राहल्यावर तुमचा रंग गोल्डन-ब्राउन दिसत असेल तर तुमचा स्कीनटोन वार्म आहे असे समजावे.


तुमचा स्किनटोन आणि चुकीचा हेयर कलर यांची विजोड तुमचा पुर्ण लुक खराब करु शकते,कारण गरजेचे नाहि की जो हेअर कलर टीव्ही मधल्या हिरोईनला चांगला दिसतो तो तुम्हालाही सुट होईलच. हेयर एक्सपर्टच्या मते तुमच्या चेहर्याचा आकार कुठलाही असो परंतु तुमच्या केसांच्या टेक्सचर च्या हीशोबानेच कलर ची निवड करावी. विशेषकरुन जेंव्हा हेयर कलर करायचा असेल तेंव्हा तुमच्या स्कीनटोन आणि लाईफस्टाईल चा विचार करुनच तुम्ही योग्य रंग निवडावा.

हेयर कलर निवडण्याचे प्रकार

असा कलर निवडावा जो तुमच्या केसांच्या शेड पेक्षा एक किंवा दोन शेड डार्क किंवा लाईट असेल.

हेयर कलर निवडण्याची एक आणखी योग्य पध्दत म्हणजे तुमच्या डोळ्यांच्या रंगाशी मिळता जुळता कलर पण तुम्ही घेऊ शकता.

वार्म अंडरटोन असेल कॉपर,चॉकलेट,चेस्टनट,रिच गोल्डन ब्राऊन असे कलर बेस कलर करुन गोल्ड आणि कॉपर कलर चे हायलाईट करु शकता.

कुल स्किन टोन असेल तर ब्राऊन,ब्रॉन्ड कलर निवडू शकता,यावर हनी आणि खाकी कलर चे हाईलाइट देऊ शकता.

हेयर कलर निवडतांना या गोष्टीचा विचार नक्की करा की त्यातले इंग्रीडीएन्ट्स च्या बद्दल नक्की जाणून घ्या, हेयर कलर प्रोडक्ट्समध्ये काही अशी तत्वे असतात ज्यामळे तुम्हाला अलर्जी होऊ शकते. कलर वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.

हेयर कलर करण्याआधी घ्यावयाची काळजी

हेयर कलरचे प्रकार जाणुन घेतल्यानंतर केसांना कलर करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

केसांना रंग करण्याआधी काही दिवसांपर्यंत हार्ड कंडिशनर किंवा हीट स्टायलिंग प्रोडक्ट्स चा उपयोग करू नये.

घरी केसांना कलर करण्याआधी चांगल्या क्वालीटीचे रबर ग्लव्ज किंवा डिस्पोजेबल ग्लव्ज विकत घ्यावे.

केसांना कलर करण्याआधी केसांच्या एका लटेवर कलर लावुन पहावा की तोच कलर तुम्हाला पुर्ण केसांवर लावायचा आहे कि नाही.

आधी मेहंदी किंवा मेटालीक डाई लावली असेल तर जास्त वेळ शॅम्पु केल्यावरच कलर करावा.

घरी हेयर कलर कसा करावा,, यासाठी पैकैट वर दिलेल्या निर्देशांना निट वाचून घ्यावे.

पार्लरमध्ये केसांना रंग करण्याआधी हेयर कलरच्या प्रकारांबद्दल निट माहिती करून घ्यावे.

हेयर एक्सपर्ट -टीप्स

          हेयर एक्सपर्ट जावेद हबीब च्या मते भारतीय लोकांना आधी ग्लोबल कलर करुन नंतर फाईन         स्ट्रीक्स करावा.यासाठी आधी ग्लोबल कलर करुन त्यावर हायलाईट करावा,यानी अतिशय             स्टायलिश आणि नॅचरल लुक भेटतो.हेयर कलर नॅचरलच दिसायला हवे,जास्त ब्राईट कलर           कुठल्याच केसांवर चांगले दिसत नाही.                                                                                       

        हेयर कलर केल्यानंतर केसांना चांगल्या काळजीची गरज असते.केस धुण्याच्या पाच मिनीट आधी केसांना तेल लावून मसाज द्यावी मग केस धुवावे,स्वच्छ राहतात आणि निरोगी केस खूप सुंदर दिसतात.

सावळ्या मुलींसाठी योग्य हेयर कलर

जर तुमचा रंग सावळा आहे,आणि तुमच्या डोळ्यांचा रंग ब्लैक,ब्राउन,ब्लु किंवा ग्रे आहे तर तुम्ही ब्राऊन शेड्स वाले कलर वापरायला हवे.  


               सावळ्या रंगाच्या मुलींना ब्लू,ब्लॅक,कॉफी ब्राऊन आणि मिडीयम एस ब्राऊन, मिडीयम गोल्डन ब्राऊन आणि सॉफ्ट अंडर पिअर असे रंग छान दिसतात या प्रकारचे रंग तुमच्या चेहर्यावर चमक आणतात ज्यामुळे विना मेकअप पण तुमची त्वचा ग्लोईंग आणि चमकदार दिसते.

कुठला रंग लावू नये

गोल्ड, येलो, रेड असे रंग सावळ्या मुलींनी इग्नोर करायला हवे,असे रंग तुम्हाला डल लुक देतात.

गोर्या मुलींसाठी योग्य हेयर कलर

जर तुमचा रंग गोरा,उजळ आहे आणि डोळे निळे किंवा काळे हिरवे अथवा ब्राऊन आहे तर तुम्हाला केसांना रंग निवडतांना  जास्त काळजी बाळगायला हवी, गोरा रंग सांभाळने जास्त कठीण असते,आणि तुम्ही जेंव्हा केसांना रंग करता तेंव्हा लोक तुम्हाला लवकर नोटीस करुन घेतात.यामुळे तुम्हाला जर रॉयल लुक हवा आहे आणि तुम्हाला बघतच रहावं तर तुम्ही थोडा विचार करुनच रंग निवडायला हवा.


गोर्या मुलींनी केसांमध्ये डीप ब्राऊन विद गोल्ड, ऐंड रेड स्ट्रॉबेरी ब्लांडी,ग्रे विद येलो काल्ट,नैचरल गोल्डन ब्लांडी या प्रकारचे हेयर कलर वापरायला हवे.

कुठले रंग वापरु नये

फेअर स्कीन असणार्या मुलींनी लाईट कलर करण्यापासून बचाव करावा कारण लाईट कलरमुळे तुमचे वय जास्त दिसते.तुम्हाला यंग आणि सुंदर दिसायचे आहे तर तुमच्या स्कीनटोन आणि डोळ्यांच्या रंगाप्रमाणेच सुट होईल अशा रंगाची निवड करावी हे महत्त्वाचे आहे.

कलर्ड केसांची काळजी कशी घ्यावी

ऊन्हात जाण्याआधी कलर्ड केसांना स्कार्फ किंवा हॅटनी निट झाकुन घ्यावे,जेणेकरुन सुर्याचे हानीकारक किरण तुमच्या केसांना हानी पोचवू शकणार नाही.याच्या व्यतरिक्त तुम्ही अल्ट्रावॉयलेट फिल्टरसारखे प्रोडक्ट्स चा वापर सुध्दा करु शकता,जे केसांचे ऊन्हापासुन रक्षण करतात.

कलर केलेल्या केसांसाठी बाजारात भेटणार्या प्रोफेशनल शॅम्पूचाच वापर करावा.

समांतर वेळेवर ठरवुन नियमितपणे हेयर-स्पा करुन घ्यावा,किंवा घरीच करावा.

जेंव्हाही केसांना कलर कराल तेंव्हा केसांवर कंडिशनर जरुर वापरा,नाहीतर थोडयाच वेळात केसांची चमक कमी होऊ लागते,आणि केस खुप रुक्ष दिसू लागतात.

           तर तुम्ही तुमच्या सौंदर्याचे रंग शोधलेत का  ?

 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bottom Ad [Post Page]