स्वतःला कमी लेखने, अपात्र किंवा अयोग्य समझने , मनात निराशा आणि तुच्छता अशा हिन भावनांना जन्म देते.जर तुम्हाला अशी भावना जानवत असेल तर पुढील काही गोष्टी फक्त तुमच्यासाठी आहेत.
मनात अयोग्यतेचा /कमीपणाचा विचार कसा निर्माण होतो:
दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो, अनेक संकटे झेलत असतों, प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी घटना अशी घटते जी मनावर परिणाम करुन जाते.आणि मनात नकारात्मक विचार निर्माण होतो.काही लोक संकटांना तोंड देत पुढे निघून जातात पण काही जे मनाने नाजूक आणि भावनांना जास्त महत्त्व देतात ते लोक तिथेच अडकून पडतात.आणि इथूनच नकारात्मक विचार सुरू होतात.आधी का? , कसं, कशामुळे असे प्रश्न पडतो आणि मग हळूहळू निराशा, तनाव, खिन्नता मनाला ग्रासते.आणि मग मनात अयोग्यतेचा, कमीपणाचा विचार निर्माण होतो, आपण स्वतःला कमी लेखतो, अयोग्य मानतो, दुसऱ्याशी बरोबरी करू लागतो.स्वत:वरचा विश्वास पुर्णपणे कमी होत जातो.
स्त्रीयांना मिळणारी वागणूक:
आपण प्रत्येकाच्या घरात बघतो, विशेष करून घरी असणाऱ्या महिला, ज्या दिवसभर सगळ्यांसाठी झटत असतात, मुलं, नवरा,सासु-सासरे आणि इतर मंडळी.प्रत्येकाच्या आवडी-निवडी, कामं, दुखणीं सर्व काही सुरळीत करण्यासाठी आपण मात्र स्वतःला झोकून देऊन काम करतात. स्वतःला कधी वेळ देत नाही, स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत.सर्वांना आनंद देण्यात सौख्य मानतात. परंतु हिच वागणूक सर्वजण गृहीत धरून तिला हिनवतात, तिला काही कळत नाही, म्हणून ती लाचारीने हे सगळं तुमच्यासाठी करते, अशी जाणीव तिला करून दिली जाते, अशी वागणूक सर्वजण देऊन तिला तिच्या कमीपणाचे, पाठ शिकवायला सुरुवात करतात.मोठ्यांपासुन लहानांपर्यत प्रत्येकजण तिला शिकवण देत असतो, जसं की तिला काही कळत नाही, प्रत्येकजण तिच्यात काहीतरी वाईट शोधत असतो, जेणेकरून त्यांना स्वतःचा हुशारपणा तिला दाखवता येईल. प्रत्येक जण स्वतःमधील कमी दाखवतो आहे म्हणून आपल्यातच काही कमी असेल या भावनेने तिच्या मनात अयोग्यतेचा, कमीपणाचा विचार येतो, आणि हळूहळू तिच्या मनात निराशा निर्माण होते.बाकीच्यांच्या मनाचा विचार करताना तिला स्वतःला विचार आहे हे ती विसरून जाते, स्वतःला कमी लेखते, स्वतःमधील चांगले गुण विसरून जाते आणि हळूहळू कमीपणाची भावना वाढीस लागते.
निराशा आणि अयोग्यतेच्या विचारातून बाहेर कसे पडायचे:
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्यांची मदत करताना स्वतःला पूर्णपणे विसरून जाऊ नका.काम कुठल्याही प्रकारची असो, घर किंवा बाहेर ऑफिस मध्ये ते काम स्वतःला आनंद देईल या साठी करा.दुसऱ्यांना खुश करण्यासाठी कराल तर त्यात यश कधीच मिळणार नाही.कारण कुणासाठी कितीही आणि काहीही कराल आणि पुढच्या व्यक्तीला त्याची जाणीव नसेल तर त्याचा परिणाम विपरीतच होईल.लोक तुम्हाला गृहीत धरून वाईटच बोलणार, म्हणून जिथे गरज आहे तीथेच मदत करा,जेवढी गरज आहे तेवढीच करा.लोकांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका.स्वतःचा आत्मसन्मान जपला पाहिजे, जेणेकरून कुणी तुमचा अपमान करणार नाही, तुमच्यातील कमीपणा दाखवणार नाही.
नकारात्मक विचार तेव्हा जास्त येतात जेव्हा आपण दुसऱ्याच्या मनाप्रमाणे जगतो, दुसऱ्याच्या मनाप्रमाणे विचार करून निर्णय घेतो.दुसऱ्याच्या आवडी-निवडी जपताना स्वतःला पूर्णपणे विसरून जातो.पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे करू नका.स्वतःला महत्त्व देणं शिका, स्वतःच्या आवडी-निवडी जपायला सुरू करा.आयुष्यात स्वतः साठी जगणं सुरू करा.स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.आनंदी रहायला शिका.दुसऱ्यांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करा.स्वतःचा आत्मविश्वास वाढेल असे कामं करा.
स्वतःला योग्य कसे बनवायचे?
मी योग्यच आहे असं बोलायला सुरुवात करा.मनातील न्युनगंड काढून टाका.स्वतःच्या चांगल्या गुणांना स्वतःलाच बोलून वारंवार डायरी मध्ये लिहा.आरशासमोर उभं राहून स्वतःच्या आवडी-निवडी स्वतःशीच बोला, स्वतःचे कौतुक स्वतःशीच करा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे जेणेकरून कुणी तुमचा अपमान करणार नाही.तुम्ही स्वतःचा सन्मान केला तरंच दुसरे तुम्हाला सन्मान देतील.
तुम्ही हे सर्व करताना, स्वतःला हळूहळू बदलताय हे तुमच्या लक्षात येईल आणि हळूहळू कमीपणाची भावना, अयोग्यतेचा विचार सगळं तुमच्या मनातून निघून जाईल.आणि हळूहळू तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.
मग बदलणार ना स्वतः ला ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा