गृहीणी म्हणजे नेमकी कोण, घरातील सर्व कामे करणारी महिला किंवा स्त्री , (गृह) म्हणजेच घर, त्याला सांभाळणारी महिला जिला आपण गृहीणी म्हणतो.तिलाच इंग्रजी भाषेत Housewife अथवा Homemakerअसंही म्हणतात.भाषा कुठल्याही प्रकारची असो मुख्य स्वरूपात जी संपूर्ण घर आणि घरातील माणसांना सांभाळते तिला आपण गृहीणी म्हणून ओळखतो.
गृहीणी नक्की घरातील काय कामे करते?
गृहीणी घर सांभाळणारी म्हणजे नेमकी काय कामे करते.तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून घर साफ करणे म्हणजे झाडून स्वच्छ करूने,भांडे घासणे, झाडांना पाणी देणे, पाणी भरणे सर्वजण उठल्यावर सगळ्यांना चहा, कॉफी,नास्ता बनवून खायला देणे, सगळ्यांना सगळ्या वस्तू हाताशी देणे, सगळ्यांचे डबे भरून देणे, मुलांना तयारी करून शाळेत सोडायला जाणे.घरातील वडिलधाऱ्या आणि वय झालेल्या व्यक्तींचे वेळेप्रमाणे औषधी देणे, त्यांची काळजी घेणे, स्वयंपाक बनवणे.मुले शाळेतुन घरी आल्यावर त्यांचा अभ्यास करून घेते.संध्याकाळी परत स्वयंपाकघरात काम करून सर्व आवरून सगळ्यांना झोपवून ती शेवटी झोपायला जाते.
" बापरे म्हणजे संपूर्ण दिवस न थांबता एकसारखी कामं करत राहते".आणि तेही विना पगार, म्हणजे दिवसभर दुसऱ्यांसाठी निस्वार्थपणे कुठल्याही अपेक्षा न करता झटत राहते.एवढच काय कधीच सुट्टी पण घेत नाही.नोकरी करणार्यांना पण सुट्टी असते.पण जेव्हा लोकांना सुट्टी असते तेव्हा तिला मात्र दुप्पट काम करावी लागतात.
म्हणजे संपूर्ण दिवस काम करून, विना सुट्टी विना पगार कामं करुन जेंव्हा तिला विचारले जाते तु काय काम करते तेव्हा, मी काही करत नाही कारण मी गृहीणी आहे किंवा नवीन ट्रेंड प्रमाणे मी Housewife आहे, असं उत्तर का देत असतात.
परिस्थिती नुसार बंधणे
आजकाल जास्तीत जास्त महिला बाहेरच्या जगात कामं करत आहेत म्हणजेच नोकरी आणि व्यवसाय.बदलत्या काळानुसार स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक प्रकारे झटत असतात.आणि हे पूर्णपणे योग्य आहे, प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.
परंतु महिलांना काय करायचे हे पूर्णपणे तिच्या इच्छेप्रमाणे घडत नाही कारण संस्कृती म्हणा किंवा परिस्थिती म्हणा लग्नानंतर बायकांच्या बाबतीत घर आणि घरातील व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते, आणि घरातील कर्तव्य पार पाडावे लागतात.मुलांचा सांभाळ , वडिलधाऱ्यांची काळजी, नवऱ्याचा आणि घरातील व्यक्तींचा नकार, आजारपण, आर्थिक स्थिती अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे भरपूर महिलांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.आणि नाइलाजाने त्यांना घरी राहून घर सांभाळणारी म्हणजे गृहीणीची जबाबदारी पार पाडावी लागते.
मी काहीच करत नाही/ मी हाऊसवाईफ (गृहीणी) आहे
घर सांभाळणारी स्त्री ही असुशीक्षीत किंवा अडाणी आहे असं अजिबात नाही.तुमच्यातील कितीतरी महिला अनेक प्रकारच्या डिग्री घेतलेल्या आणि काही उच्च पदावीधर सुद्धा आहेत.परंतु आप-आपल्या वयक्तीक कारणांमुळे गृहीणी आहात.म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्याची आणि अस्तित्वाची पूर्णपणे जाणीव आहे.शिक्षीत आहे म्हणून नोकरी करायची की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे.कारण तुमच्या आयुष्यात काय अधिक महत्त्वाचे आहे हे फक्त तुमचं मत आहे आणि असायलाच हवं.
मग घरातील सर्व कामे करणारी महिला किंवा स्त्री जेव्हा कुणी तु काय करते असे विचारले असता मी घरीच असते मी काहीच करत नाही असं उत्तर का देत असते.खरं तर हि परंपरा आपल्यातीलच काही नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी निर्माण केली आहे.मी नोकरी करते मी खूप टॅलेन्टेड आहे असं मोठेपणा दाखवणे गरजेचे असते असं काही विशेष लोकांना वाटते.मग तु दिवसभर घरीच असते का? बाहेर का जात नाही, काहीतरी करायलाच हवं, ज्यामुळे आपल्याला कुठेतरी आपण कमी पडतो असं जाणवायला लागते ,आपला आत्मविश्वास खचतो आणि दिवसभर केलेल्या कष्टांना विसरून मी काहीच करत नाही असं उत्तर दिलं जातं. आपण एवढे खचून जातो की आपणही सुशिक्षित आणि पदविधर आहोत याची जाणीव राहत नाही.खंर तर प्रत्येकाच्या घरात गृहिणी असतेच आई,बहिण,काकु,मावशी आणि त्या काय करतात हेही सर्वांना माहिती आहे. तरीही तु काय करते असा प्रश्न का विचारावासा वाटत असेल.
"मी गृहीणी आहे,' हे
सांगण्याची लाज किंवा कमीपणा का वाटावा ?
गृहीणी असणे किंवा मी गृहीणी आहे असे सांगणे कमीपणीचे अथवा लाजिरवाणे का वाटावे. खरंतर माझ्यामते
बाकीच्या सर्व कामांपेक्षा सर्वात मोठे आणि स्वाभिमानाचे काम आहे. निस्वार्थपणे अविरत
चोविसतास दुसर्यांसाठी झटत राहणे, कुठलीही अपेक्षा न करता प्रेमाने सर्वांना
सांभाळने हे खुप कुशलता आणी संयमाचे काम आहे.तुम्ही दोन हातांनी असंख्य कामे करता
ज्यासाठी तुम्हाला कुणी पगार देत नाही. कामाची किंमत मिळाली तरच ते काम योग्य ठरतं
अस होत नाही. बाहेर जाणार्या महिला एकच काम करतात परंतु तुम्ही असंख्य कामे करता,
तुमच्यात भरपूर टॅलेन्ट आहे आणि संधी मिळाली तर तुम्ही बाहेरची कामे पण योग्य
प्रकारे हाताळू शकता.
तुमचा स्वतःवर विश्वास
असायला हवा, तुमची परीस्थीती फक्त तुम्हाला माहिती आहे.त्यामुळे स्वतःचा
आत्मसन्मान तुम्ही स्वतःच सांभाळायला हवा. तुम्ही गृहीणी आहात या गोष्टीचा कमीपणा
न बाळगता स्वाभिमान बाळगायला हवा. यापुझढे तुम्हाला कुणी विचारले तु काय करते तर
स्वाभिमानाने मी गृहीणी आहे, मी संपुर्ण घर सांभाळते असं अभिमानाने सांगायला शिका.
मी गृहीणी आहे आणि मला
त्याचा अभिमान आहे, आणि तुम्हाला ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा