Women's Talk

All issues about women's life,discus here

Post Page Advertisement [Top]

जीवनशैली (Lifestyle) म्हणजे नेमकं काय, कशी असावी

जीवनशैली (Lifestyle) म्हणजे नेमकं काय, कशी असावी

 जीवनशैली म्हणजे नेमकं काय असा प्रश्न विचारला तर, जीवनशैली ही जीवन जगण्याची एक पध्दत आहे, जी व्यक्तींची मुल्ये आणि कौटुंबिक दृष्टीकोन प्रतीबिंबीत करते.किंवा जीवनशैली म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात घडणारे वर्तन आणि क्रियाशीलता यांचा समावेश होतो ज्यामध्ये आपण जे अन्न खातो, विचार करतो, विश्रांतीच्या पध्दती, आपण जे काम करतो, कौटुंबिक मित्र, शेजारी यांच्याशी साधलेला संवाद. जीवनशैली म्हणजे जिवन जगण्याची अशी पध्दत ज्यामुळे जगणे जास्तीत जास्त सुखकारक होईल.   


  
                          

 जीवनशैली म्हणजेच आजच्या काळातील" Lifestyle असे आपण म्हणू शकतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे केले जाते ते सर्व जीवनशैली मध्ये अंतर्भूत आहे. रोजचे घातले जाणारे पोषाख, बोलीभाषा, कुटुंबपद्धती, शिक्षण पध्दती, संस्कार, आणि शिष्टाचार हे सगळं जीवनशैली ठरवत

पूर्विपासून चालत आलेली भारतीय जीवनशैली म्हणजे,"लवकर उठे लवकर निजे तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य भेटे", अशीच होती. सणवार आणि त्या निमित्ताने धार्मिक कार्य, पुजा पाठ, एकत्र कुटुंब पद्धती, स्त्रीने घर सांभाळणे आणि पुरुषांनी कमाईची कामे करणे, दागदागिने घालणे, अंगभर कपडे, घरकाम आणि मुलेबाळे सांभाळणे ही स्त्री चे काम होते आणि पैसा मिळवून आणने, शेती -व्यवसाय सांभाळणे हे पुरुषांनी करायचे अशी जुनी जीवनशैली होती.                                                                 

 परंतु आता भारतीय जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्याची पद्धत वेगळी आहे, स्त्री आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या नोकरी आणि व्यवसायाप्रमाणे, आणि आर्थिक परिस्थिती प्रमाणे जगण्याची पद्धत वेगळी आहे.आजच्या काळात विशेषतः तंत्रज्ञान विकसित झाले असून Social platform हे रोजच्या जीवनात अगदी गरजेचे झाले आहे. आजच्या काळात लोकांना दिखाऊपणा करण्यात अधिक मजा येते. Social status च्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक स्थान उंचावण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. ते स्वतः कसे दिसतात यापेक्षा इतरांच्या नजरेत ते कसे दिसतात यावर जास्त विश्वास ठेवतात. ज्यामुळे बरेच वेळा परवडत नसतानाही फॅशनेबल कपडे, ब्रॅण्डेड ऐक्सेसरीज, महागडे फोन आणि आरामदायक जीवनशैली जगण्याकडे जास्तीत जास्त लोकांचा कल वाढला आहे.

शैली शिवाय जीवन निर्जीव आहे, शैली हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याची सुरुवात तुमच्या सकाळच्या दिनचर्येपासून होते आणि पुढे तुम्ही दिवसभर स्वतःला ज्या पद्धतीने वाहून नेतात ते समाविष्ट होते. शैली फक्त ब्रॅण्डबद्दलच नाही तर तुम्ही कुठे फिरायला जाता, लोकांना भेटता, काय जेवता आणि लोकांमध्ये कसे मिसळता हे देखील महत्वाचे आहे. जीवनशैलीत जगणे ही एक कला आहे त्यात प्रभूत्व मिळवण्यासाठी समर्पण आवश्यक आहे.

जीवनशैली जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामधील काही प्रचलित शैलीचे प्रकार आहेत - ते पुढीलप्रमाणे 

साधी जीवनशैली - दैनंदिन जीवनात साधं राहणीमान, साधारण पोषाख, सात्विक आहार, कुठलाही दिखाऊपणा न करता साधेपणाने जगण्याची पद्धत म्हणजे साधी जीवनशैली.

आधुनिक जीवनशैली - आजच्या काळातील Lifestyle तंत्रज्ञान विकसित गोष्टींचा वापर करून आरामदायक जीवन जगण्याची पद्धत ज्यामध्ये स्टायलिश ब्रॅण्डेड ऐक्सेसरीज, महागडे फोन, वेस्टर्न कपडे, फास्ट फूड, ट्रेंड प्रमाणे जगण्याची पद्धत ही आधुनिक जीवनशैलीची छोटीशी ओळख.

स्वस्थ जीवनशैली - यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम करणे, आवश्यक आरोग्य योजना, योग आणि ध्यान, व्यसन मुक्त जीवन ज्यामुळे आपल्याला पुर्णपणे निरोगी राहण्यासाठी मदत होते, निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्याची पद्धत म्हणजे स्वस्थ जीवनशैली.

आध्यात्मिक जीवनशैली - भौतिक जग आणि सुविधा सोडून परमेश्वराच्या सानिध्यात मन आणि शरीराने ध्यानमग्न अवस्थेत ज्ञान प्राप्त करून, आंतरीक शांतता प्राप्त करणे. त्यासाठी नियमित आध्यात्मिक पध्दती संस्कार यांचे पालन करणे म्हणजे आध्यात्मिक जीवनशैली.

बैठी जीवनशैली - आजच्या काळात विकसित तंत्रज्ञान आणि व्यक्तिंना भरपूर आरामदायी सुखसुविधा मिळत आहे ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात बरेच बदल झाले आहेत. जसे की पायऱ्यांचा वापर न करता लिफ्ट वापरायची, ऑफिसमध्ये किंवा घरी लॅपटॉप वर एकाच ठिकाणी बसून काम करणे, मुलांना बाहेर न काढता घरीच मोबाईल वर गेम्स खेळणे, बाहेरून जेवण मागवणे अशा अनेक प्रकारे आपल्या शारीरिक कामाला आळा बसला आहे ज्यामुळे आपल्या बरेच आरोग्याबाबत समस्या निर्माण होतात. शरीराला त्रास न देता सारखे बसून काम करण्याची पद्धत म्हणजे बैठी जीवनशैली.

नैसर्गिक जीवनशैली - आजच्या रासायनिक गोष्टींचा वापर न करता निसर्गाच्या सानिध्यात जगण्याची पद्धत, ज्यामुळे प्रदुषण नियंत्रण, झाडे लावणे, मोकळी स्वच्छ हवा, पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक जीवनशैली.

सुधारित जीवनशैली

ही जीवन जगण्याची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आपल्या प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. प्रत्येकाच्या सवयी, आवडी-निवडी, राहणीमान, भाषा, संस्कृती, संस्कार, आर्थिक स्थिती सगळंच वेगळं आहे परंतु सुधारित जीवनशैली म्हणजे आपल्या जीवनातील काही नकळत निर्माण झालेल्या सवयी, आवडी-निवडी, राहणीमान बदलने जसे की दैनंदिन जीवनात काही उत्तम आणि वैचारिक गोष्टी करायच्या.एक नवीन सुधारित जीवनशैली निर्माण करायची त्यामध्ये काही जुन्या वाईट गोष्टी सोडून नव्या जोडायच्या. उदाहरणार्थ - रोज सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, सकारात्मकता, सात्विक आहार घेणे, आरोग्य योजना, नियमितपणा, उत्तम वाचन हे सगळे उत्तम आणि सुधारित जीवनशैलीच्या पध्दती आहेत. ज्यामुळे आपल्याला साचेबद्ध जीवन जगण्याची कला प्राप्त होते. चांगल्या पद्धतीने आत्मसात केल्यास एक उत्तम जीवनशैली तयार होते स्वस्थ, निरोगी आणि आनंदी.

एक उत्तम जीवनशैली कशी असावी

नियमित व्यायाम करावा 


नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, तेंव्हाच आपण स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी मदत होते. आजच्या काळातील बदलत्या सवयींमुळे बहुतेक लोकांना अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रस्त केलय लठ्ठपणा , हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक प्रकारच्या आजारांवर मात करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्याने शरीरात लवचिकता वाढते, काम करण्याची क्षमता वाढते. शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते.

बुद्धीला चालना देण्यारे खेळ खेळा, पुस्तके वाचा 


शरीराप्रमाणेच डोक्याला आणि बुद्धीला विशिष्ट व्यायामाची गरज आहे. शरीराप्रमाणे डोक्याला स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र म्हणजे डोक्याला चालना देण्यासाठी बुद्धीबळाचे खेळ खेळा, ज्यामुळे डोक्याला विचार करावा लागेल आणि त्याचा व्यायाम होईल. त्याचप्रमाणे पुस्तके वाचा, पुस्तक आपला खरा मित्र असतो. पुस्तके आपल्याला अनेक प्रकारचे ज्ञान देतात आणि बुद्धीला स्वस्थ ठेवतात.

जवळचे नाते आणि समुदाय जोपासने 

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या आजारांवर मात करण्यासाठी आनंदी राहणं आवश्यक आहे. आपल्या प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्याला आनंद देतात ते आपले जवळचे नाते आणि मित्र.


 आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात आपण आपल्या मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना सामील करून संकटे आणि प्रश्नांची उत्तरे शोधतो. त्याचप्रमाणे मनातील तान, चिंता विसरून मित्र, शेजारी यांच्यासह अनेक आनंदी क्षण घालवत असतो. म्हणून नेहमी आनंदी राहण्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना जोपासना करणे आवश्यक आहे.

वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे

निरोगीपणा तुम्हाला जीवनामध्ये बदल करण्यासाठी प्रोत्साहित करते. औषधे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी, वेदनांवर मात करण्यासाठी आणि वृद्धत्वाची काही लक्षणे कमी करण्यात मदत करु शकतात. आरोग्य तपासणी वेळोवेळी करून तुम्ही तुमच्या आरोग्याची निट काळजी घेतली पाहिजे. 

पौष्टिक आहार घेणे

संतुलित आहार घेणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. आहारात आरोग्यदायी बदल केल्याने तुमचे वजन कमी होण्यास संप्रेरक पातळी संतुलित करण्यात आणि वेदना व्यवस्थापीत करण्यात मदत होऊ शकते.

अधिक पाणी पिणे पौष्टिक आहाराचे पालन करणेआवश्यक आहे. तुमचा आहार तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवतात. 

मेडिटेशन (ध्यान) करणे


 मेडिटेशन म्हणजेच ध्यान करणे. मेडीटेशन केल्याने तुमचे मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते. उत्तम जीवनशैली जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक आहे रोज सकाळी लवकर उठून मेडीटेशन करणे. ध्यान केल्याने तुमच्या राग, चिंता, तनाव आणि मानसिकरीत्या निरोगी राहता येते. चिंतामुक्त आणि आनंदी स्वास्थ्य राखण्यासाठी मेडिटेशन म्हणजेच ध्यान करणे आवश्यक आहे.

तुमची जिवन जगण्याची पद्धत कशी आहे?




  







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bottom Ad [Post Page]