Women's Talk

All issues about women's life,discus here

Post Page Advertisement [Top]

महिलांच्या विचार परिवर्तनाची आवश्यकता.

महिलांच्या विचार परिवर्तनाची आवश्यकता.

 नमस्कार मैत्रीणींनो, आजचा आपला विषय आहे परिवर्तन.  

परिवर्तन म्हणजे काय ? तर, कुठल्याही गोष्टीमध्ये नावीन्यपूर्ण बदल करून नवनिर्माण करणारी शक्ती म्हणजेच परिवर्तन. अथवा कुठल्याही जुन्या परंपरेला सोडून तयार होणारी नवीन पद्धत/ विचार म्हणजे परिवर्तन. 

आपल्या आयुष्यात सतत नवनवीन परिवर्तन घडत असतात ज्यांचे आपण सहज स्वीकार करून घेत असतो.जसे लहानांच मोठ होणं, सुखातुन दुखी होणं, मुलीच लग्न झाल्यानंतर दुसर्‍या घरी जाणं हे सगळेच बदल सहजशक्य आहेत जे आपण सहज स्वीकार करून घेतो. असे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक बदल आपल्या आयुष्यात घडत असतात. पण या सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे वैचारिक परिवर्तन होय.

आपल्या आयुष्यात किंवा आपल्या डोळ्यासमोर घडणारी एखादी गोष्ट निरंतर घडत असेल तर ती तशीच बघण्याची सवय आपल्याला असते, तीला बदलण्याचा विचार आपण करत नाही. आणि जर ती बदलली तर आपल्याला रूचतही नाही. काही विशिष्ट गोष्टींबद्दल घडलेले परिवर्तन आपण स्वीकारत नाही.

उदाहरणार्थ:- 

एक संदर्भ घेऊ, एका मुलीच लग्न होतं, आणि ती सासरी जाते, सुरवातीला सगळेच छान वागणूक देतात परंतु लवकरच मुलीचा सासरच्यांकडून छळ सुरू होतो. तिच्यावर अनेक प्रकारे अत्याचार केले जातात. हे सगळं शेजारी,  नातेवाईक बघत असतात. सगळे तिचे सांत्वन करत असतात, मुलीचा जन्मच वाईट असतो, आपल नशीब मानुन चालावं, आम्ही परके मधात कसं बोलणार,  तुझ तुलाच कराव लागेल,  लग्न झाल्यावर थोड सहन करावच लागतं. शेजारील बायकांना तीची फार काळजी वाटते खूप गुणी पोर आहे हो, सासूच खट्याळ आहे, नवर्‍याला कळायला नको, बीचारी खूप सहन करते अशाप्रकारे हिम्मत देतात पण मदतीला मात्र कुणीच येत नाही. 

शेवटी ती माणूस आहे, तिलाही दुखतं, लागतं, त्रास होतो कुठपर्यंत सहन करणार. शेवटी एक दिवस ती स्वतःच उभी राहते स्वतःच संरक्षण करण्यासाठी. ती बोलते जगण्यासाठी, लढते आयुष्यासाठी. आता मात्र नातेवाईकांना फार त्रास होतो "अशी वागणूक शोभते का तुला, काय तोंड दाखवणार लोकांना. शेजारच्या बायकांचा मनस्ताप वाढतो, किती शांत दिसत होती हो वाटल नव्हतं अशी निघेल, कशी बोलते बघीतलं का, आजकालच्या पोरी ऐकत नाहीत, फारच वाईट निघाली असं बोलून तिलाच टोमणे मारत निघून जातात. 

तात्पर्य  :- कालपर्यंत सुन अत्याचार सहन करत होती तर ती खूप संस्कारी आणि गुणवान होती पण आज तिने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच वाईट झाली. असं का ? एखाद्याला दुःखात मदत करायची सोडून त्यालाच दोषी ठरवून मोकळ व्हायचं. ही चूक कुणाची, समाजाची . समाज कोण घडवतं आपणच ना. समाजात घडणारे  बाकीचे बदल आपण सहज स्वीकारतो मग हा का नाही. 

खरंतर प्रत्येक ठीकाणी सहभाग घेणारी स्त्रीच होती. सासू, नणंद,  आई, काकू, शेजारीण मग अशा घटना घडतात कशा . कारण एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीची मदत करत नाही.खंबीरपणे पाठीशी उभी राहून बळ देत नाही. म्हणूनच म्हणतात ना बाईच बाईची शत्रु असते. महिलांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. पण असं होत नाही, आणि कारणीभूत नेहमी समाजाला ठरवतो. आणि हीच विचारसरणी बदलण्याची गरज आहे. महिलाच महिलांच्या परिवर्तनाचा स्वीकार करीत नाहीत मग समाजाला दोष का द्यावा. सर्वप्रथम महिलांमधील विचारसरणीत परिवर्तन घडवने आवश्यक आहे.आपण दुःख सहन केल तर चांगल नाहीतर वाईट हा विचार बदलण्याची खूप गरज आहे, आपण बदललो तर दुसरे बदलतील. 

आपल्याच विचारसरणीतील काही जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांचे परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळवून आपल्याच आयुष्यात नावीन्य आणण्यात सक्षम व्हायलाच हवे. आपल्या आयुष्यात घडणारे बदल स्वीकारून नवीन दृष्टीकोन निर्माण होईल. निरंतर घडणारी घटना बरोबरच असेल असे नाही, नवीन घडणारी गोष्ट चांगली आहे हे माहीत असूनही आपण स्वीकार का करत नाही. आणि म्हणूनच वैचारिक परिवर्तनाची आपल्याला खूप गरज आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनात अनेक बंधन असतात, तसेच अनेक वाईट गोष्टींना समोरे जावे लागते, समाज आपल्यामुळे घडतो. आपणच स्वतःला समजून घेतल्याशिवाय आणि बदलल्याशिवाय परिवर्तन घडवून आणता येणार नाही. प्रत्येक स्त्री ने स्वतःमधील बदल स्वीकारण्यात सक्षम असायलाच हवे. 



प्रत्येक स्त्री ने दुसर्‍या स्त्रीची मदत करणे आवश्यक आहे. महिलांमध्ये एकत्रीतपणा असायला हवा. महिलांनी वेळप्रसंगी दुसर्‍या महिलेला समजून घेणे हा सुद्धा एक परिवर्तनाचा भाग आहे.कठीण असेल पण अशक्य मुळीच नाही. एखादी गोष्ट वाईट झाली तर नशीब किंवा दैव म्हणून आपण त्याला पटकन स्वीकार करून घेतो, परंतू वाईटातून चांगल घडत असेल तर त्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह लाऊन टाळले जाते. चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला आपण मागे का हटतो.  वाईटातून चांगल घणाऱ्यां गोष्टींचा हसतमुखाने स्वीकार करणे हे खूप मोठे परिवर्तन होय. 

आपल्या आयुष्यात फक्त आपणच परिवर्तन घडवून आणू शकतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bottom Ad [Post Page]