नमस्कार, आपण नेहमीच बघतो आपण कुणाला भेटल्यावर नमस्कार करण्याची अथवा आपल्याहुन मोठ्यांच्या पायावर डोके ठेवून वंदन करण्याची संस्कृती किंवा संस्कार आपल्यावर आहेत. असेच अनेक संस्कार आपल्यावर लहाणपणापासूनच केले जातात. देव पूजा, मोठ्यांना वंदन आणि बर्याच गोष्टी ज्या आपण पिढीजात शिकतोय आणि त्यांचे पालनही करतोय. पण कधी आपण त्यामागचा उद्देश काय असेल. किंवा हे संस्कार का पाळावे ह्याचा विचार करत नाही. हे सगळे आपल्या आयुष्यात चांगले वळन लागावे मोठ्यांचा आदर करावा , आपण एक चांगल आयुष्य जगावं म्हणून हिंदू संस्कृतीनुसार केलेले संस्कार आहेत.
पण, ह्या संस्कारामागे काही वैज्ञानिक दृष्टिकोन अथवा कारणे आहेत, हे आपल्याला कदाचित माहीत नसेल. प्राचीन काळापासून चालत आलेले संस्कार काही विशिष्ट कारणास्तव आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिले असतील, कारण प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी हेतू नक्कीच असतो. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही हेतुपुरस्सर केली जाते आणि म्हणूनच आज आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्यावर घडणार्या काही संस्कारांमागे असलेली वैज्ञानिक कारणे काय आहेत. आपल्या संस्कृतीत अनेक संस्कार किंवा परंपरा आहेत. उदाहरणार्थ -
तुळशीची पुजा करणे.
भांगेत कुंकू लावणे अथवा टिकली लावणे.
लग्न झाल्यावर बायकांना काही विशिष्ट अलंकार घालणे जसे - सोन्याचे दागिने, पायात बिछवे आणि नाक टोचने, बांगड्या घालने .
लग्नात हातावर मेंहदी लावणे.
नमस्कार करणे.
मंदिराची घंटा वाजवणे.
उपवास करणे.
तुळशीची पूजा करणे
तुळशीला हिंदू संस्कृतीत देवीचे स्थान देण्यात येते, आपण तिची पुजा करतो. यामागे काय दृष्टीकोन असेल माहीत करून घेऊया. तुळशी ही आयुर्वेदातील सर्वात महत्वाची वनऔषधी आहे. ताप, खोकला, सर्दी, अपचन, डोकेदुखी, आणि इतर सामान्य विकार बरे करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून ते नेहमीच वापरले जाते. हे कीटक आणि जीवाणूंना दूर ठेवते,शरीराचे जंतू आणि रोगांपासून संरक्षण करते. तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्यास प्रतिकारशक्ती मजबूत होते.
तुळशीच्या पानांच्या फायद्यांची संख्या काही मुद्यांपुरती मर्यादित असू शकत नाही. या पवित्र वनस्पतीने वेळोवेळी आपल्या लोकांना रोग आणि महामारीपासून वाचवले आहे. त्याचे महत्त्व आणि क्षमता व्यापक आहेत म्हणून आपण तुळशीला देवी म्हणून का पूजतो याचे समर्थन आहे.
कपाळावर कुंकू अथवा टिळक लावणे.
कपाळावरील भुवयांच्या मधली जागा मानवी शरीरातील एक प्रमुख बिंदू मानला जातो. टिळक ऊर्जेची हानी टाळते आणि एकाग्रतेच्या विविध स्तरांवर नियंत्रण टिकवून ठेवण्यात मदत करते. शिवाय हे लावतांना कपाळाच्या मध्यभागी असलेले बिंदू आणि आद्य-चक्र दाबले जाते, ज्यामुळे चेहर्याच्या स्नायुंना रक्तपुरवठा सुलभ होतो.
हळद चुना आणि धातुचा पारा मिसळून सिंदूर तयार केला जातो. त्याच्या आंतरीक गुणधर्मामुळे पारा रक्तदाब नियंत्रण करतो. तसेच कपाळावर चंदन लावल्यावर डोके शांत राहून एकाग्रता वाढते. आयुर्वेदानुसार महिलांनी सिंदूर लावल्याने कपाळातील चक्रे सक्रिय होतात ज्यामुळे सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो.
सोन्या - चांदीचे दागिने घातल्यावर होणारे परिणाम
वैज्ञानिक तत्त्वांनुसार चांदी पृथ्वीच्या उर्जेवर चांगली प्रतिकया देते.म्हणून चांदी शरीराच्या खालील भागात घातली जाते. जसे - पैंजण, बिछवे , पायातल्या अंगठ्या अथवा कडे. आधीच्या काळात महिला जाड कडे पायात घालत असत. चांदिची पायघोळ घातल्यास शरीरातील रक्ताभिसरण होण्यास मदत होते ज्यामुळे पायाचे दुखणे, टाचांच्या वेदना कमी होतात.
सोने हे हृदयासाठी अनुकूल धातू मानले जाते जे आपल्या शरीराच्या वरच्या भागात घातले जाते. जसे- सोन्याचा नेकलेस, मंगळसुत्र, कानातले, अंगठी जे तुमच्या शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते आणि त्यामुळे तुमच्या शरिराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन मिळते. म्हणूनच जुन्या काळात गर्भवती महिलांना पोटाभोवती सोन्याचे दागिने घालण्याचा सल्ला देण्यात येई. ज्यामुळे मुल आणि आई दोघांना उत्तम स्वास्थ्य मिळावे.
सोने शरीरातील तापमान नियंत्रित करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.सोने त्वचेला उबदार आणि सुखदायक कंपने प्रदान करते ज्यामुळे आपल्या शरिराला पेशी पुन्हा निर्माण करण्यास मदत करते. अनेक स्कीनकेअर आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. त्वचेच्या विविध समस्या जसे की एक्जीमा, बुरशीजन्य संसर्ग, त्वचेवर पुरुष, त्वचा जळने इत्यादींवर उपचार करण्यात याचा उपयोग होतो. सोन्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासंबंधी अनेक प्रकारे उपयोग करू शकतो.
कान टोचणे - अनेक चिकित्सक मानतात कान टोचल्याने बुद्धी, विचारशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.म्हणूनच हिंदू संस्कृतीत बाळाचे कान टोचण्याची प्रथा आहे. कानात नसा असतात ज्या डोळ्यांना आणि महिलांमधील पुनरुत्पादन अवयवांना जोडतात. सोन्याचे झुमके घातल्याने घर्षण होते आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.शिवाय कानातले घातल्याने ॲक्यूपंक्चर प्रभाव पडतो.पुर्वीच्या काळात स्त्री- पुरुष दोघेही कानात घालत असत.
अंगठी घालने - अंगठी स्त्री आणि पुरूष दोघांनी परिधान करावयाचा सामान्य अलंकार आहे, आपल्या शरीराच्या नसा एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि धातु आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. अनामिकामध्ये एक मज्जातंतू असते जी मेंदुद्वारे हृदयाशी जोडली जाते. त्यामुळे अनामीकेत अंगठी घातली जाते.
नाक टोचणे - डाव्या नाकपुडीतून जाणार्या नसा स्त्रियांच्या पुनरुत्पादन अवयवांशी संबंधित असल्याने स्त्रियांनी डाव्या नाकपुडीत रिंग घालण्यास संस्कार आहेत.
हातावर मेंहदी लावणे
मेंहदी ही एक अतिशय शक्तीशाली औषधी आहे जी शरिराला थंड ठेवते आणि मज्जातंतुंना ताणतणाव होण्यापासून वाचवते. म्हणूनच लग्नसमारंभात नवरा- नवरीला हाता - पायांवर मेंहदी लावतात ज्यामुळे त्यांचा ताण व थकवा दूर होईल. परंतु आजकाल ही विधी फक्त सौंदर्य किंवा फॅशन म्हणून वापरतात आणि तेही ओरीजिनल मेंहदी न वापरता अनेक केमिकल्स असलेली कोण वापरले जातात.
मोठ्यांना नमस्कार करणे
जेंव्हा तुम्ही वृद्धांच्या किंवा मोठ्यांच्या पायाला स्पर्श करता तेंव्हा त्यांच्या हृदयातुन सकारात्मक उर्जा उत्सर्जित होते, जी ते त्यांच्या हातांच्या बोटांद्वारे प्रसारीत करतात. अर्थात दोघांची सकारात्मक उर्जा एकत्रीत येऊन उर्जेचा प्रवाह सक्षम करते आणि वैश्विक उर्जा वाढवते. तुमची हातांची बोटे आणि समोरच्याचे तळवे उर्जेचे ग्राहक आणि द्योतक बनतात. ज्यामुळे तुम्ही एक सकारात्मक उर्जेचे ग्रहण करता. याच उद्देशाने हिंदू संस्कृतीत आपल्याहुन सर्व मोठ्यांना प्रत्येक शुभ प्रसंगी नमस्कार करतात जेणेकरून आपल्या भरपूर सकारात्मक उर्जा मिळावी.
उपवास करणे.
आयुर्वेदातील अनेक रोगांचे मुळ कारण पचनसंस्थेला विषारी पदार्थांची साठवण झाल्यास होते, असे मानतात. विषारी पदार्थांची नियमित साफसफाई केल्याने व्यक्ती निरोगी राहते. उपवास केल्याने पाचन अवयवांना विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व यंत्रणा शुद्ध आणि दुरुस्त होतात. त्यामुळे आठवड्यात एक उपवास नक्कीच करावा.
मंदिरातील घंटा वाजवणे
मंदिरात प्रवेश करतांना आपण मंदिरातील घंटा वाजवतो कारण त्याचा आवाज आपले मन स्वच्छ करून आपली पूर्ण एकाग्रता भक्तीवर ठेवून आपल्याला तीक्ष्ण राहण्यास मदत करते. शिवाय या घंटा अशाप्रकारे बनवल्या जातात की त्यांच्यामधून निर्माण होणारा आवाज आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागात एकता निर्माण करतो. घंटा नादाचा कालावधीत आपल्या शरीरातील सर्व सात उपचार केंद्रांना सक्रिय करण्यासाठी आदर्श ठरतो, ज्यामुळे आपली नकारात्मकता दूर होते.
कुठल्याही गोष्टीचे अनुकरण करताना त्याची पुर्ण माहीती करुन घेणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा