Women's Talk

All issues about women's life,discus here

Post Page Advertisement [Top]

महिलांच्या दैनंदिन अशक्तपणाची कारणे व उपाय

महिलांच्या दैनंदिन अशक्तपणाची कारणे व उपाय

 महिलांच्या दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या शारीरिक अशक्तपणाची वेगवेगळी कारणे असू शकतात. शरीरात पोषक तत्त्वांची कमी, थकवा, चिंता, तणाव, कामांचा अधिक ताण, घर आणि नोकरी सांभाळण्याची दगदग अथवा आजारपणा अशा अनेक कारणांमुळे अशक्तपणा जाणवतो.



अशक्तपणा पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक का जाणवतो कारण महिलांची शारीरिक संरचना पुरुषांपेक्षा वेगळी असते. ज्यामुळे मासीक धर्म, रक्ताची कमतरता, डीलेव्हरी अशा अनेक कारणांमुळे अशक्तपणा जाणवतो. घरातील कामे व बाहेरील नोकरीची कामे करणे त्यामुळे होणारी धावपळ ज्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. प्रत्येक स्त्री च्या शारीरिक बळ आणि मन: स्थिती प्रमाणे अशक्तपणाची वेगवेगळी कारणे असू शकतात.

अशक्तपणा यालाच अस्थेनिया असंही म्हणतात. जो अशक्तपणा, उर्जा आणि शक्तीचा अभाव यासाठी वैद्यकीय संज्ञा आहे. अशक्तपणा तुमच्या संपूर्ण शरीरात किंवा हात पायांमध्ये सुद्धा होऊ शकतो. अशक्तपणा हा मानसिक तणावामुळेही होऊ शकतो, जसे ताण, नैराश्य, चिंता यामुळेसुद्धा अशक्तपणा जाणवतो. 

अशक्तपणा होण्याची कारणे

शारीरिक स्थिती खराब असेल किंवा इतर आजार.                                     

कमी अथवा जास्त वजन असणे.

कुपोषणामुळे किंवा असंतुलित पोषण, Vit ची कमतरता.

चयापचय स्थिती, स्वयंप्रतीकार क्षमता कमी असणे .

कॅल्शियम ची अथवा vit D ची कमतरता. 

 मानसिक ताण, नैराश्य, चिंता आणि इतर अनेक कारणे

अशक्तपणात दिसणारी लक्षणे

स्नायू दुखणे आणि वेदना होने

थरथरने किंवा सतत झोप येणे आणि थकल्यासारखे वाटणे

दैनंदिन कामे करण्यासाठी सक्षम नसणे , वारंवार थकवा येणं

वारंवार आजारी पडणे, ताप येणे

श्र्वास लागणे किंवा श्र्वास घेण्यासाठी अडचण येणे

जलद हृदयगती अथवा धडधडणे, अस्वस्थ असल्याची भावना. 

महिलांमध्ये अशक्तपणाची कारणे वेगवेगळी असतात. त्यातील काही दैनंदिन जीवनात आरोग्याची निट काळजी न घेतल्यास निर्माण होतात आणि त्यासाठी नियमित पोषक आहार व पोषक घटक आहारात सामील करने खूप आवश्यक असतात, ते पुढीलप्रमाणे

                                                         व्हिटॅमिन बी १२

व्हिटॅमिन बी १२ तुमच्या शरीरातील कार्बोहाइड्रेटचे ग्लुकोजमध्ये रुपांतर करते जे शरीराला एनर्जी देते. तसेच vit B12 शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे थकवा दूर होतो, झोप नीट लागते, डोळ्यांचे विकार, हृदयरोग, मानसिक ताण यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. यासाठी आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मशरूम, बादाम, मोड आलेली कडधान्ये, आंबवलेले पदार्थ सामील करावेत.


प्रोटीन

योग्य प्रमाणात प्रोटीन घेतल्यास तुमच्या शरीराला एनर्जी मिळते. प्रोटीन मांसपेशींच्या विकास करण्यासाठी मदत करते, तसेच स्नायू बळकट करण्यासाठी आणि पुनर्प्राप्ती मध्ये लाभ होतो. चरबी कमी करण्यासाठी, मुड निट होतो, चिंता, तणाव कमी करण्यासाठी उपयोगी पडते. प्रोटीन हाडे मजबूत करते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते. अंडी, मांस, डाळी, कडधान्ये, दही, चीज या सर्व पदार्थांचे सेवन करावे.

                                                              आयरन

आयरनच्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता होऊ शकते. आयरनमुळे तुमच्या पेशींना ऑक्सिजन मिळतो आणि कमी असेल तर थकवा जाणवतो. महिलांच्या शरीराला आयरनची खूप आवश्यकता असते. त्यासाठी आहारात पालेभाज्या,पालक, बीन्स, फळभाज्या खाने खूप आवश्यक आहे.


                                                              कॅल्शियम

जास्ततर महिलांना अशक्तपणामुळे सांधेदुखी व शारीरिक क्षमता कमी होते. जसे जसे वय वाढत जाते तसे गुडघे दुखी, कंबर दुखणे, व हाडांच्या समस्या निर्माण होतात कारण मजबूत हाडांसाठी कॅल्शियम ची खूप गरज आहे. रोजच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे जसे की दुध, दही, पनीर, बादाम, संत्रा, अंजीर, ब्रोकोली, शेवग्याच्या शेंगा.

                                                               फायबर

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याबरोबरच समृद्ध आहार आपल्या हृदयाचे आरोग्य नियंत्रित ठेवते. आतड्याच्या सिंड्रोममध्ये वजन कमी करण्यासाठी आणि त्वचा निरोगी व चमकदार ठेवण्यासाठी देखील फायबर उपयोगी ठरते. फायबर घेतल्यास पोटाच्या संबंधित त्रास जसे बद्धकोष्ठता, अपचन इ निट ठेवते. एवोकेडो, डाळी, ओटमील, बीन्स, सोयाबीन आणि नाशपती हे फायबरयुक्त पदार्थ आहेत.



                                                             व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी हाडे मजबूत ठेवण्यासाठी तसेच डायबेटिस नियंत्रित करण्यासाठी मदत करते. हृदयरोगांपासून दुर ठेवते, कॅन्सरपासून सुरक्षा करतो. मेमरी स्ट्राॅग बनवतो, पोटाच्या विकारांवर उपयुक्त ठरतो. सुर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा प्रमुख व महत्त्वाचा स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त अंडी, संत्रा, दुध, चीज हे पदार्थ खाल्ल्याने व्हिटॅमिन डी ची आवश्यकता पूर्ण होऊ शकते.

                                                          व्हिटॅमिन सी

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन सी असणे आवश्यक आहे. शरीरातील कोलेस्ट्राॅल कमी करुन हृदयसंबंधीत आजारांचा धोका कमी करतो. लोहाच प्रमाण कमी असल्यास व्हिटॅमिन सी मुळं भरुन निघेल. शरीराची इम्यूनिटी वाढवते. तुमच्या शरीरात कोलेजनची मात्रा वाढवते, त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. थकवा कमी करते. व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी संत्रा, पपई, ब्रोकोली, सिमला मिरची या सगळ्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.



तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार घेताय ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Bottom Ad [Post Page]